Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

घटनेची पायमल्ली पंतप्रधानांच्या कानावर घालेन : मंत्री आठवले

बेळगाव : बेळगावसह सीमाभागात घटनेची पायमल्ली करून जर मराठी जनतेवर अन्याय केला जात असेल तर याची माहिती मी नक्कीच माननीय पंतप्रधानांच्या कानावर घालेन, असे आश्वासन महाराष्ट्राचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाला दिले. बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने दिल्ली मुक्कामी आज शुक्रवारी …

Read More »

वादग्रस्त विधानावरून आम. रमेशकुमार यांनी मागितली माफी!

बेळगाव (वार्ता) : सुवर्णसौधमधील अधिवेशनात काल वादग्रस्त विधान केलेल्या माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आ. के. आर. रमेशकुमार यांनी अखेर माफी मागितली. शुक्रवारी सायंकाळी विधानसभेत रमेशकुमार यांनी बलात्कारावरून वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठली. सर्वपक्षीयांनीही टीका केली. आपल्या विधानावरून आता रणकंदन माजणार हे लक्षात आल्याने रमेशकुमार …

Read More »

सौंदलगाजवळ अपघातात दोन ठार

कोगनोळी (वार्ता) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्‍या सौंदलगा जवळच मोटर सायकल व कार अपघात होऊन दोन ठार झाल्याची घटना शुक्रवार तारीख 17 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या अपघातात ठार झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कार क्रमांक एमएच 03 सीबी 4915 …

Read More »

जमीन बळकावल्याच्या चौकशीसाठी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने

बेळगाव : एका मंत्री आणि भाजप आमदाराच्या जमीन बळकावल्याच्या आरोपांवर आज शुक्रवारी विधानसभेत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली. यावेळी सिद्धरामय्या यांच्या मागणीला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी गटातील आमदारांनी एकच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सभापती विश्वनाथ कागेरी हेगडे यांनी, आजच्या …

Read More »

बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून विटंबना

बेंगळुरू : सदाशिवनगर बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमानाचा प्रयत्न कर्नाटकात काही संघटना व समाजकंटकांकडून होत आहे. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लाल-पिवळ्याची होळी केल्याने भगव्याचा अवमान …

Read More »

चार बंधू आमदार, त्या वृत्ताची राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी घेतली विशेष दखल

बेळगाव :  विधान परिषदेच्या निवडणूक निकालांकडे साऱ्यांचे लक्ष लागलं होतं. यात प्रामुख्याने कर्नाटक विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना बेळगाव जिल्ह्यात भाजपाचे सर्वाधिक आमदार आहेत. येथील निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता होती. यात निवडणुकीच्या निकालातून जारकीहोळी बंधूचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जारकीहोळी कुटुंबातील ३ जण सध्या आमदार आहेत. …

Read More »

यल्लम्मा डोंगराच्या चार चेकपोस्टवर भाविकांची तपासणी, आरोग्य आणि पोलिस खाते सतर्क

बेळगाव : महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्ण वाढू लागल्याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. त्याचबरोबर काल गुरुवारी बेळगावात ओमिक्रोन रुग्ण आढळला आहे. कोरोना संक्रमण आणि ओमिक्रोन धास्तीने 19 डिसेंबरला होणाऱ्या सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीची पोर्णिमा यात्रेसह बेळगाव जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव, महोत्सव, धार्मिक विधी, आदीं कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध लादले आहेत. शनिवार दिनांक …

Read More »

आनंदवाडी येथील जागेसंदर्भात धर्मादाय मंत्र्यांशी चर्चा

बेळगाव (वार्ता) : आनंदवाडी येथील घरे ताब्यात घेण्यासाठी वक्फ बोर्डाने प्रयत्न केले होते. मात्र याविरोधात न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारचा प्रयत्न यापुढे होऊ नये आणि येथील रहिवाशांना बेघर व्हावे लागू नये. यासाठी आता हा मुद्दा विधानसभेत मांडण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याच्या धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले …

Read More »

1971 युद्धाने देशाला बळकट करण्यासाठी नवी प्रेरणा दिली : मुख्यमंत्री बोम्माई

शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली; शौर्य विजेत्यांच्या अनुदानात वाढ बेळगाव (वार्ता) : 1971 साले झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला. त्याला 50 वर्षे पूर्ण होत असताना, 1971 च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी श्रद्धांजली वाहिली. बेळगावातील मराठी लाइट इन्फंट्री सेंटरच्या प्रांगणात गुरुवारी (दि. 16) आयोजित ’विजय दिवस’ …

Read More »

पाठबळ नसतानाही मतदारांमुळे जारकीहोळी विधानपरिषदेत : युवा नेते उत्तम पाटील

मतदारांसह कार्यकर्त्यांचे मानले आभार निपाणी (वार्ता) : कोणत्याही वरिष्ठ नेतेमंडळींचे पाठबळ नसताना केवळ मतदार व कार्यकर्त्यांमुळेच अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी विजयी झाले आहेत. त्याचे सर्व श्रेय मतदार व कार्यकर्त्यांना जाते. सर्वांच्या सहकार्यामुळेच जारकिहोळी हे विधानपरिषदेत पोहचले आहेत. त्यांच्या वतीने मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. यापुढील काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी भागात …

Read More »