बेळगाव : ग्रामीण भागातील लोकांना प्रशासनाच्या अधिक जवळ आणण्यासाठी आणि मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकाराने विकेंद्रीकरणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि पहिल्या टप्प्याला बळ मिळत आहे, असे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी म्हटले. ते बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेडिगेरी गावामध्ये नूतन ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटनानंतर बोलत होते. या कार्यक्रमात …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक गुरुवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे. तरी म. ए. समितीचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत हजर रहावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार …
Read More »बेळगावचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सुधाकर शानभाग यांचे निधन
बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सुधाकर शानभाग यांचे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. सुधाकर शानभाग यांचे वार्धक्याने निधन झाले. शानभाग हे बेळगाव कॉलेज रोडवरील सन्मान हॉटेलचे मालक होते. अलिकडेपर्यंत ते हॉटेलचे प्रमुख होते. दुपारी १ वाजता सदाशिवनगर रुद्रभूमी येथे अंत्यसंस्कार केला जाणार आहे. सुधाकर शानभाग यांच्या निधनाबद्दल …
Read More »जातीय जनगणनेला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी तहकूब; पुढील सुनावणी आज
बंगळूर : राज्य सरकारच्या जातीय जनगणनेला आव्हान दिलेलेल्या जनहित याचिकेची (पीआयएल) सुनावणी आज (ता. २३) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. जातीय जनगणनेला आव्हान देणाऱ्या ब्राहण महासभा वक्कलिग संघाचे वरिष्ठ वकील सुब्बारेड्डी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी मुख्य न्यायाधीश विभु बक्रू आणि न्यायमूर्ती सी. एम. जोशी यांच्या खंडपीठासमोर झाली. …
Read More »विश्व विख्यात दसरा महोत्सवाचे शानदार उद्घाटन
बानू मुश्ताक यांनी चामुंडी देवीला वाहिली पुष्पांजली बंगळूर : जगभरातील लाखो पर्यटकांना आकर्षित करणारा आणि राज्याची कला, संस्कृती, वारसा आणि इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या जगप्रसिद्ध दसरा महोत्सवाला आज अधिकृतपणे चालना देण्यात आली. यासह, म्हैसूर या सांस्कृतिक शहरात ११ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका बानू …
Read More »ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ. दिलीप कदम यांचे निधन
बेळगाव : वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ आणि सन्माननीय व्यक्तिमत्व, डॉ. दिलीप कदम यांचे २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. मूळचे मुजावर गल्ली, बेळगाव, येथील असलेले डॉ. कदम गेल्या अनेक वर्षांपासून पुणे येथे स्थायिक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. सोहम कदम (एमबीबीएस, एमडी) आणि सून …
Read More »गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या लॉरीला संतप्त हिंदू कार्यकर्त्यांनी लावली आग
बेळगाव : कुडची येथून हैद्राबादकडे गोमांसाची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी लॉरीला अडवून चक्क लॉरीलाच आग लावून आपला संताप व्यक्त केल्याची घटना कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथील उगार रस्त्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ सोमवारी रात्री 10 च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुडची शहरातून हैदराबादला ५ टन गोमांसाची अवैध वाहतूक होत …
Read More »आम. आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत जाती सर्वेक्षणाला सुरुवात
बेळगाव : बेळगावात आजपासून जाती आणि सामाजिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. आज, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत जाती आणि सामाजिक सर्वेक्षणाला प्रारंभ झाला. सर्वेक्षण करण्यासाठी घरी आलेल्या शिक्षकांना नागरिकांनी त्यांच्या जाती, धर्म आणि इतर सामाजिक माहिती दिली. यावेळी नगरसेवक आणि अधिकारीही उपस्थित होते.
Read More »सांबरा येथील रास्ता रोको प्रकरणी 8 जण निर्दोष
बेळगाव : सांबरा येथे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या रस्ता रोको प्रकरणी माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2018 साली अतिवृष्टी झाल्याने सांबरा विमानतळाच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या बाजूला शेतकऱ्यांचा रस्ता पावसाने उध्वस्त झाला होता. सदर रस्ता व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने सांबरा …
Read More »महिलांनी चूल आणि मूल न करता स्वावलंबी बनावे : माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर
खानापूर : धर्मस्थळ स्वसहाय्य संघाचा तालुकास्तरीय महिला मेळावा खानापूर येथील शनाया गार्डन येथे काल दि. 21 सप्टेंबर रोजी पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी बोलताना डॉ. अंजलीताई निंबाळकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta