खानापूर : कर्नाटक राज्याचे माजी मंत्री श्री. आर. व्ही. देशपांडे व त्यांचे चिरंजीव श्री. प्रशांत देशपांडे यांची खानापूर तालुक्याला नुकताच भेट झाली.यावेळी तहसील कार्यालयाला भेट देऊन तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्याकडे मास्क, सॅनिटाइझर व व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा साठा सुपूर्द केला व गरजु लोकांपर्यंत पोहचवण्याची सुचना केली,यावेळी बोलताना माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे …
Read More »खानापूर – जांबोटी क्राॅसवर रस्ता झाला सुना सुना
खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे लाॅकडाऊन कडक करण्यात आला. मात्र जत- जांबोटी महामार्गावरील रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने खानापूर शहराच्या जांबोटी फाट्यावरील अनेक खोकी हटल्याने आता खानापूरचा जांबोटी क्राॅसवर सुना सुना वाटत आहे.सध्या कोरोनामुळे कोणच बाहेर पडत नाही. मात्र खोकी हटवण्याची सक्ती करण्यात आल्याने रविवारी सोमवारी दोन दिवस खोकीधारकानी आपली खोकी …
Read More »कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव : १९८६च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समिती आणि अन्य संघटनांच्या वतीने मंगळवारी अभिवादन करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात मंगळवारी सकाळी १९८६च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांच्या त्यागाचे समरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नी कटिबद्ध व्हा असे …
Read More »कर्नाटकात ४२ दिवसानंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद
बेंगळुरू : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वेग मंदावला आहे. सोमवारी, ४२ दिवसानंतर राज्यात सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासात, नवीन संसर्ग झालेल्या रुग्णांपेक्षा दोन पटहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मे महिन्यातच ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचणारा सकारात्मकता दर आता १३.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोविडची …
Read More »विठ्ठल देसाई व ए. ए. मुल्ला यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता खानापूर) अरण्यविभागाचे कर्मचारी विठ्ठल देसाई आणि उपवलय अधिकारी ए. ए. मुल्ला यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा नुकताच पार पडला.यावेळी अरण्य वलय अधिकारी प्रशांत गौरानी याच्याहस्ते शाल, श्री फळ, भेटवस्तू, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.निवृत्त कर्मचारी विठ्ठल देसाई यांनी ४२ वर्षे सेवा केली आहे.तर उपवलय अधिकारी …
Read More »कोरानाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) जिल्ह्यात 15 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरानाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात यापुर्वीच्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 1 जून 21 रोजीच्या सकाळी 7 वाजल्यापासून ते दिनांक 15 जून 21 रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई …
Read More »राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ निश्चित?
तांत्रिक सल्लागार समितीचा मुख्यमंत्र्यांना अहवाल बंगळूरू : राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ बहूतेक निश्चित आहे. येत्या 13 जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन वाढविण्यासंबंधात तांत्रिक सल्ला समितीने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना आपला अहवाल सादर केला आहे. अहवालामध्ये लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आल्याचे समजते. राज्यात सध्या सात जूनपर्यंत लॉकडाऊन जारी आहे. त्यानंतर …
Read More »4 लाख 70 हजारची दारु जप्त, आजरा पोलीसांची मोठी कारवाई
महिन्याभरात तिसरी कारवाई, 11 लाख 22 हजारांची दारु जप्त तेऊरवाडी (एस. के. पाटील) : येथील आजरा आंबोली रोडवर तुळसी धाब्याजवळ आजरा पोलीसांनी कारवाई करत 4 लाख 70 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. याप्रकरणी शिवाजी ग्यानबा भुते व गणेश महादेव पिंगळे (दोघे रा.खर्डा, ता. जामखेड, जि.अहमदनगर) यांच्यावर कारवाई …
Read More »लसीकरणानंतर बारावीच्या परीक्षा घेण्याचा सल्ला : सुरेशकुमार
बेंगळुरू : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्यानंतरच राज्यात बारावीच्या परीक्षा घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली. बेंगळूरमध्ये सोमवारी पत्रकारांशी बोलताना सुरेशकुमार म्हणाले, मुलांचा भविष्याच्या दृष्टीने परीक्षा घ्यावी असा जोरडा अभिप्राय व्यक्त करण्यात …
Read More »संभाव्य पूर स्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ
बेळगाव : मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर संभाव्य पुरस्थितीचा सामना करण्यासाठी, खबरदारीच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. उपमुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री गोविंद करजोळ यांनी सोमवारी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांसह, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संभाव्य पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोणती पावले उचलली जावी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta