कोल्हापूर : गेल्या 19 दिवसांपासून एसटी कर्मचार्यांनी विलगीकरणासाठी एल्गार पुकारला आहे. मात्र, राज्य सरकारने तो मुद्दा बाजूला ठेवत 41 टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर विलीनीकरणाचा निर्णय समितीचा अहवालानंतर घेतला जाईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. दरम्यान, वेतनवाढ झाल्यानंतर विलीनीकरणाच्या मुद्यावर एसटी कर्मचारी आग्रही आहेत. त्यामुळे आझाद …
Read More »न्हावेलीत गोवा दारू साठ्यावर छापा; एक लाख तीस हजारचा साठा हस्तगत, एकावर गुन्हा दाखल
चंदगड : न्हावेली ता. चंदगड येथे गोवा बनावटीच्या बेकायदा दारु साठ्यावर चंदगड पोलिसांनी छापा टाकून एकूण 1 लाख 30 हजार 592 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी न्हावेली येथील आरोपी संतोष महादेव गावडे (पाटील) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने संतोष याने घराच्या मागील बाजूस असलेल्या जनावारांच्या गोठ्यात दारूसाठा करून …
Read More »निपाणीत अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई वाहतुकीच्या कोंडीसह अपघात
शिस्त लावण्याची मागणी निपाणी : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील बस संप सुरू असल्याने येथील बसस्थानक परिसरात खाजगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. अनेक वेळा अंधारात रस्त्यावरच वाहने लावून प्रवाशांना निर्माण करत आहेत परिणामी वाहतुकीची कोंडी व लहान-मोठे अपघात होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी येथील बसस्थानक परिसरात निपाणी – कोल्हापूर …
Read More »बोरगाव नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण जाहीर लवकरच होणार
निपाणी : शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर महिना संपण्यापूर्वी घ्याव्यात असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व निवडणूक आयोगाला नुकतेच दिले होते. या अनुषंगाने 23 नोव्हेंबर 2021 रोजी नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण जाहीर केले आहे. यामुळे बोरगाव नगर पंचायती लवकरच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर नगरपंचायतीसाठी मतदान …
Read More »शेतकरी विरोधी मागे घेतलेला कायदा पास होईपर्यंत आंदोलन सुरूच
राजू पोवार : निपाणीत संविधान दिन कार्यक्रम निपाणी : केंद्र सरकारने केलेल्या शेतकर्यांच्या विरोधातील काळा कायदा संदर्भात देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी तब्बल वर्षभर आंदोलन केले. त्यामुळे सरकारने नमते घेऊन सर्व तिन्ही कायदे मागे घेतले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेचा नैतिक विजय झाला आहे पण अजूनही राज्य आणि लोकसभेमध्ये हा कायदा मागे …
Read More »खानापूर बंद 100 टक्के यशस्वी : मोर्चाने निवेदन
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमधील अनेक धंदे आणि व्यवसायांमध्ये परप्रांतीयांनी अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेला ‘खानापूर बंद’ 100 टक्के यशस्वी झाला. बंदसह व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये परप्रांतीयांनी जाळे पसरवून स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायांवर अतिक्रमण सुरू केले …
Read More »खानापूर-कणकुंबी-चोर्ला रस्त्याची दुरावस्था
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कणकुंबी-चोर्ला या 30 किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्याची दुरावस्था झाली. याकडे लोकप्रतिनिधीचे तसेच संबंधित खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खानापूर-जांबोटी-कणकुंबी-चोर्ला या मार्गावरून प्रवाशाना प्रवास करताना खड्ड्याशी सामना करावा लागतो आहे. या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून खड्डे बुजविलेच नाही. त्यामुळे वाहनधारकांना …
Read More »जगजंपी ’हॅपी होम’ योजनेत सामील होण्याची संधी : मल्लिकार्जुन जगजंपी यांचे आवाहन
बेळगाव : 50 ते 60 वर्षापर्यंतच्या नागरिकांना आपले भावी जीवन सुखाने जगता यावे याकरिता बेळगावपासून 11 कि.मी. अंतरावर असलेल्या बेळगुंदी गावानजीक निसर्गरम्य वातावरण असलेल्या सुमारे साडेचार एकर जागेत 155 फ्लॅटस् तयार करण्यात येणार असून या योजनेत नागरिकांनी सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जगजंपी बजाज उद्योग समूहाचे मालक …
Read More »आरपीडी कॉलेजची कार्यशैली लक्ष्यवेधी
बेळगाव : एसकेई सोसायटीचे राणी पार्वती देवी महाविद्यालय हे बेळगावातील प्रसिद्ध आणि नामवंत महाविद्यालय. उत्तम शैक्षणिक दर्जा, कुशल आणि दर्जेदार प्राध्यापक वृंद, भव्य आणि निसर्गरम्य व नॅककडून ‘अ’ – श्रेणी प्राप्त महाविद्यालय, उत्तम शिक्षण, सुंदर परिसर, भव्य क्रीडांगण, अद्ययावत आणि भव्य ग्रंथालय अशा सर्व सोयीनी युक्त असे महाविद्यालय अशा अनेक …
Read More »बस सेवा सुरळीत करण्याची तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी
बेळगाव : शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोलमडलेली बससेवा विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तात्काळ सुरळीत करण्यात यावी आणि आवश्यक ठिकाणी अतिरिक्त बसेसची सोय करावी, अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta