खानापूर : मातृभाषेतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच दुर्गम भागातील इतर इयत्तेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले . जांबोटी सी.आर.पी. मधील आमगाव, आमटे, चापोली, चिरेखानी, गवसे, हब्बनट्टी, जांबोटी, कालमनी, ओलमणी, वडगाव, विजयनगर तर कणकुंबी सी.आर.पी. मधील बेटणे, हुंळंद, पारवाड, चिखले, चोर्ला, मान, …
Read More »अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन गांभीर्याने!
बेळगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव व प्रगतशील लेखक संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज 20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे जीएसटी अप्पर आयुक्त श्री. आकाश चौगुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शिवराज चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नीला …
Read More »दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, जनता दरबारात कानाखाली मारली
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात हल्ला झाला आहे. भर कार्यक्रमात एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली आहे. या घटनेनंतर दिल्ली आणि देशात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी यावरून भाजपवर निशाणा साधलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. …
Read More »विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
मुंबई : जळगावमधील एरंडोल तालुक्यातील खेडी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खेडी गावाजवळील एका शेतात या पाचही जणांचे मृतदेह आढळले आहेत. शेताकडे जात असताना विजेचा धक्का लागल्याने या सर्वांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली …
Read More »सरकारी मराठी शाळा नं. 19 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
बेळगाव : सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा नं. 19 या शाळेतील 1995-96 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन तब्बल 30 वर्षानंतर गेल्या रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडले. टिळकवाडीतील न्यू उदय भवन येथे आयोजित हा स्नेहमेळावा तब्बल 50 हुन अधिक माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थितीने अविस्मरणीय ठरला. प्रारंभी शाळा नं. 19 च्या निवृत्त …
Read More »रामदुर्गमध्ये घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग शहरात मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू असून सदर घटना शहरातील निंगापूर पेठ येथील महादेव मंदिराजवळ घडली. ७५ वर्षीय वामनराव बापू पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घराचे छत कोसळले आणि मातीत गाडले गेले. …
Read More »माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीकडून उपरराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराच नाव जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. त्यांच्यासमोर भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सीपी राधाकृष्णन यांचे आव्हान …
Read More »धर्मस्थळ अपप्रचाराच्या निषेधार्थ भर पावसात भव्य मोर्चा
बेळगाव : गेल्या एक महिन्यापासून हिंदू धार्मिक तीर्थस्थान धर्मस्थळाविषयी निराधार आरोप करून खोटा प्रचार करून धर्मस्थळ नाव कलंकित करण्याच्या घटना घडत आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी मंगळवारी समस्त हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे भव्य शक्तीचे दर्शन घडले. यावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी सदर मुद्दयाबाबत माहिती …
Read More »गोकाक येथे घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोकाक शहरात घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. फरिदाबानू शकीलअहमद कानवाड वय ५० असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना आज सकाळी घडली. गंभीर जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …
Read More »पूर परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा; गरज नसल्यास घराबाहेर पडू नका : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे जिल्हावासियांना आवाहन
पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी कोल्हापूर (जिमाका): जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तथापि पूर परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta