Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

रुद्र जिमचा महेश गवळी ‘मि. रॉ क्लासिक’ किताबाचा मानकरी

    बेळगाव : रॉ फिटनेसच्यावतीने बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अँड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित मिस्टर क्लासिक जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या विजेतेपदासह ‘मि. रॉ क्लासिक’ हा मानाचा किताब रुद्र जिमच्या महेश गवळी याने पटकावला आहे स्पर्धेतील ‘उत्कृष्ट पोझर’ किताबाचा मानकरी गोकाकचा सागर कळ्ळीमनी हा ठरला. भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे …

Read More »

आशादीपतर्फे दुर्गम भागातील पाच शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

  येळ्ळूर : येळ्ळूर गावचे सुपुत्र, आशादीप वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष व अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांच्याकडून खानापूर दुर्गम भागातील असोगा, नेरसा, चाफा वाडा, हणबरवाडा व कोंगळा (नदीतून वाट काढून) येथील 200 हुन अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना अभियंते हणमंत कुगजी म्हणाले, शिक्षित …

Read More »

बेळगाव बीम्समध्ये आणखी एका बाळंतीण महिलेचा मृत्यू

  बेळगाव : बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. तुम्मरगुद्दी गावातील बनांती नामक महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे तीला गेल्या तीन दिवसांपासून अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तथापि दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता तिचा मृत्यू झाला असून एपीएमसी पोलिस ठाण्यात …

Read More »

हुतात्म्याचे वारसदार शट्टूपा चव्हाण यांचे निधन

    बेळगाव : बेळगुंदी येथील रहिवासी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर कार्यकर्ते शट्टूपा भावकू चव्हाण (वय ४०) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी सकाळी 11 वाजता बेळगुंदी येथे होणार आहे. 1986 सालच्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात बळी …

Read More »

बहुप्रतिक्षित राज्य अर्थसंकल्प उद्या होणार सादर

  सिद्धरामय्यांचे गणित काय असेल? याची उत्सुकता बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या (ता. ७) आपला विक्रमी अर्थसंकल्प सादर करत आहेत, ज्यामध्ये मूलभूत पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी कार्यक्रमांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार, ते पाच हमी योजना सुरू ठेवतील आणि अधिक लोककल्याणकारी योजनांचा समावेश करतील, अशी अपेक्षा आहे. …

Read More »

राज्यातील आठ भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या ३० ठिकाणावर छापे

  सोन्या-चांदीच्या दागिन्यासह मोठ्या प्रमाणात अनधिकृत संपत्तीचा शोध बंगळूर : भ्रष्टाचारऱ्यांविरुद्धचा शोध तीव्र करत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज सकाळी बंगळुरसह राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले आणि कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता शोधून काढली. बंगळुर, कोलार, गुलबर्गा, दावणगेरे, तुमकुर, बागलकोट आणि विजापूर यासह राज्यातील ७ जिल्ह्यांमधील ३० हून अधिक ठिकाणी लोकायुक्तांनी …

Read More »

शाॅपिंग उत्सव, ईव्ही ऑटो एक्स्पो फर्निचर 7 ते 11 प्रदर्शनाचे आयोजन

  बेळगाव : उत्तर कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक नगरीत प्रथमच शाॅपिंग उत्सव प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहन, फर्निचर, गुंतवणूक व विमा प्रदर्शनाचे आयोजन यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशनने मराठा मंदिर येथे शुक्रवार दि. 7 ते मंगळवार दि. 11 मार्च दरम्यान 5 दिवस आयोजित केले आहे. एकाच छताखाली 75 स्टॉल मधून सुमारे 10 हजार …

Read More »

बेळगाव महानगरपालिका महापौर, उपमहापौर निवडणूक 15 मार्च रोजी

  बेळगाव : येत्या शनिवार दि. 15 मार्च 2025 रोजी बेळगाव महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर निवडणूक होणार असून महापौर पदाचे आरक्षण सामान्य श्रेणी तर उपमहापौर पदाचे आरक्षण सामान्य महिला असे असणार आहे. बेळगाव महापालिकेच्या 23व्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक अखेर प्रादेशिक आयुक्तांनी काल बुधवारी जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या …

Read More »

जायंट्स मेनतर्फे शनिवारी जागतिक महिला दिन

  बेळगाव : सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे शनिवार दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी शहरातील एक सन्माननीय नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. परशराम घाडी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कपिलेश्वर रोड येथील स्वतःच्या …

Read More »

ऑटोरिक्षा भाडेदर निश्चित करावेत; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना बेळगाव : जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. शहरात धावणाऱ्या ऑटो-रिक्षा-वाहनांना अनिवार्य भाडेदर असणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, अशास्त्रीय पद्धतीने बसविण्यात आलेले गतिरोधक तातडीने हटवावेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात गुरुवारी (६ मार्च) झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीच्या …

Read More »