राज्यपाल गेहलोत; ‘हमी’मुळे आर्थिक व्यवस्था बिघडल्याच्या आरोपाला चोख उत्तर बंगळूर : हमी योजनांच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील आर्थिक व्यवस्था बिघडली आहे, विकासाला धक्का बसला आहे, या विरोधकांच्या आरोपांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या माध्यमातून सरकारने चोख उत्तर दिले. राज्य सरकारच्या हमी योजनांमुळे राज्यातील विकासाला कोणताही धक्का बसला नाही. आर्थिक परिस्थिती बिघडलेली नाही, …
Read More »राज्यपालांचे अधिकार केले कमी; भाजप-धजदचा राज्य सरकारविरुद्ध निषेध
बंगळूर : राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकार राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष भाजप आणि धजदने सोमवारी निदर्शने केली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आणि त्यानंतर लगेचच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आमदारांच्या घरापासून विधानसभेपर्यंत निषेध मोर्चा काढला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि शिकारीपुराचे आमदार बी. वाय. विजयेंद्र, कर्नाटक …
Read More »माझ्या अपहरणाशी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा काहीही संबंध नाही : व्यावसायिक अंबी यांचा खुलासा
बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करून पाच कोटी रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणाबाबत आता व्यापारी बसवराज अंबी यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा माझ्या अपहरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील राजापूर गावात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, माझ्या अपहरणाशी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा काहीही संबंध …
Read More »रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा
मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून सरकारमधील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरुन रस्सीखेंच सुरू असून अंतर्गत कुरघोडी असल्याची देखील चर्चा आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार रोहित पवार नाराज असल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा होत …
Read More »तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन
आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन सोलापूर : पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी, पायी वारी करतात. मजल, दरमजल करत पंढरपूरला येतात. तासन तास रांगेत उभे राहून बा विठ्ठालाचे तेजोमय रुप आपल्या डोळ्यांत साठवतात. आता, विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या …
Read More »अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्लाचा कट, आयएसआयकडून ट्रेनिंग घेतलेला संशयित ताब्यात
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वाड आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करत दहशतवादी कनेक्शन असलेल्या संशयाखाली एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी १९ वर्षीय, अब्दुल रहमान असून तो अयोध्येतील फैजाबाद येथील रहिवासी आहे. …
Read More »अबकारी विभागाच्या कारवाईत अंमली पदार्थ नष्ट
बेळगाव : अबकारी विभागाच्या विशेष मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ अधिकृतरीत्या नष्ट करण्यात आले. बेळगाव विभागातील विविध जिल्ह्यांत जप्त केलेले गांजा, अफू, चरस आणि अन्य पदार्थांचे नियमानुसार उच्चस्तरीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. बेळगाव विभागाचे जॉइंट कमिशनर एफ. एच. चलवादी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ड्रग डिस्पोजल कमिटीच्या सदस्यांच्या …
Read More »खादरवाडीतील अर्धवट रस्त्याच्या कामाचा जाब विचारताच ठेकेदाराचे पलायन
बेळगाव : खादरवाडी येथील मुख्य रस्त्याचे विकास काम अर्धवट झालेले असताना ते पूर्ण झाल्याचे दाखवून मंजूर झालेला निधी हडपण्याच्या प्रयत्नात असलेल्या ठेकेदाराला गावातील श्रीराम सेना हिंदुस्थान आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारताच त्याने बांधकाम साहित्य जागेवरच टाकून पलायन केल्याची घटना आज सोमवारी घडली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम व्यवस्थित …
Read More »आपली भाषा ही आईसारखी असते : रवि राजमाने
कावळेवाडी : शिक्षण हे माणसाला माणूस बनवतं.आपण बोलीभाषा बोलली पाहिजे तरच जोडले जावू शकतो लेखक हा वेगळा नाही तो स्वतंत्रपणे विचार कागदावर उतरवत असतो कवी लेखकांनी आपण कोण तरी वेगळे असल्याचे भासवून समाजातून दूर जाऊ नये. समाजात जे घडतंय ते स्पष्टपणे लिहावे. कथा ही वास्तव हवी जिवंत, काळजाला स्पर्श …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात आले कन्नड मराठी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. यावर प्रतिबंध तसेच भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या सुचनेचे पालन करणे बाबत हे निवेदन देण्यात आले वरील विषयास अनुसरुन मागील आठवड्यात बेळगाव तालुक्यातील अनेक बस कंडक्टर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta