Thursday , March 5 2026
Breaking News

Belgaum Varta

म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने केली शरद पवार यांच्याशी सीमाप्रश्नासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा

  बेळगाव : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषी आणि संरक्षण मंत्री शरद पवार यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सीमाप्रश्नासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या भावना व्यक्त केल्या. दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

विनीत हणमशेठ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताबाचा मानकरी….

  बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे पदवीपूर्व व पदवी आंतरमहाविद्यालयीन मि. बेनन स्मिथ शरीरसौष्ठव स्पर्धेत शुक्रवारी विनीत विवेक हणमशेठ या उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटूने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब पटकाविला. बेननस्मिथ मेथडिस्ट पदवी कॉलेजच्या मैदानावर आयोजित केली होती. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७० आणि ७० हून अधिक वजनी गटात घेण्यात आल्या. …

Read More »

येळ्ळूर ही लढवय्यांची भूमी : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार

    येळ्ळूर : येळ्ळूर गाव हे सैनिक आणि शिक्षकांचे गाव आहे, या गावांमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, इतिहास घडविणारे हे गाव आहे. तालुक्यातील इतर गावांनी या गावाचा आदर्श घ्यावाच लागेल. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा या गावाने दिलेले योगदान आम्हाला विसरता येणार नाही. शिक्षणाच्या विचाराने पुढे जाणारे हे गाव मला खूप भावले. …

Read More »

शंकर पाटील संकलित ‘स्वर सुवर्ण’ संग्रहाचे प्रकाशन व भक्तिरसाचा सोहळा; 450 महिलांचा सामूहिक भजन कार्यक्रम

  परमपूज्य मराठा जगदगुरू वेदांताचार्य श्री श्री श्री मंजूनाथ भारती महास्वामीजींच्या हस्ते प्रकाशन बेळगाव : संगीत साधनेसाठी आयुष्य वाहिलेल्या, समाजाला भक्तीमार्गाकडे नेणाऱ्या आदरणीय श्री. शंकरराव पाटील (किणये) यांच्या अमूल्य कार्याचा गौरव करण्यासाठी एक भव्य सोहळा आयोजिला आहे. रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजता, श्री अन्नपूर्णेश्वरी मंगल कार्यालय, …

Read More »

निवृत्त डीडीपीआय संगप्पा हळंगळी यांचे अपघाती निधन

बेळगाव : चार दिवसांपूर्वी गोंधळी गल्ली क्रॉसजवळ वाहन अपघातात गंभीर जखमी झालेले निवृत्त डीडीपीआय संगप्पा यंकप्पा हळंगळी (वय ६८ रा. सरस्वतीनगर, गणेशपूर) यांचा शुक्रवारी सायंकाळी खासगी इस्पितळात मृत्यू झाला. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ६.३० …

Read More »

शैक्षणिक – सामाजिक विकासाचा दीपस्तंभ : मराठी मॉडेल स्कूल, येळ्ळूर

  येळ्ळूर परिसराच्या आजच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासामध्ये येळ्ळूरच्या मराठी मॉडेल स्कूल, येळ्ळूर या शाळेचे फार मोठे योगदान आहे. येळ्ळूर परिसर हा बेळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विकासामध्ये अग्रेसर आहे. याचे संपूर्ण श्रेय मराठी मॉडेल स्कूलला जाते. यामुळे या भागाच्या शैक्षणिक, सामाजिक विकासाचा जणू दीपस्तंभच ठरावा अशा त-हेचे उल्लेखनीय कार्य …

Read More »

भारत विकास परिषदेच्या बेळगाव अध्यक्षपदी विनायक मोरे यांची फेरनिवड

    बेळगाव : भारत विकास परिषदेच्या वार्षिक कार्यकारिणी सभेत बेळगाव शाखा अध्यक्षपदी श्री. विनायक मोरे यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. बेळगाव शाखा सेक्रेटरी म्हणून श्री. के. व्ही. प्रभू व खजिनदार म्हणून श्री. डी. वाय. पाटील यांची निवड करण्यात आली. परिषदेच्या नूतन राष्ट्रीय महिला कार्यकारिणीच्या सदस्यपदी बेळगांव शाखेच्या सौ. स्वाती …

Read More »

पहलगाम हल्ल्यातील संशयित कठुआत? महिलेच्या माहितीनंतर खळबळ; भारतीय जवानांचे सर्च ऑपरेशन

  नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुरक्षिततेचा मुद्दा चिंतेचा झाला आहे. त्यात कठुआ जिल्ह्यात चार संशयित व्यक्ती दिसून आल्याची माहिती एका महिलेने सुरक्षा दलांना दिली. त्यानंतर कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी सर्वात मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. सर्व यंत्रणा अलर्टवर आहे. सूत्रांच्या …

Read More »

यंदाची बसवजयंती आदर्शवत ठरणार : बसव संघटनांच्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : बेळगावात यंदा बसव जयंतीचे आयोजन एका वैश्विक उद्देशाने, शांततेचा संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने करण्यात येणार आहे. सर्व बसवपंथीय संघटनांनी एकमताने ठरवले असून, ४ मे रोजीच्या मिरवणुकीत केवळ एकच चित्ररथ सहभागी केला जाणार आहे.आज कन्नड साहित्य भवन, बेळगाव येथे झालेल्या पूर्वसभेत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी जागतिक लिंगायत महासभेचे …

Read More »

सरकारी मराठी मॉडेल शाळेचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आजपासून

  दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन; महनीय व्यक्तींची उपस्थिती बेळगाव : येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाळेचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव कार्यक्रम उद्या शनिवार दि. 26 आणि रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी सध्या जय्यत तयारी करण्यात …

Read More »