Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली विद्यार्थीनी पुढील शिक्षणासाठी परदेशी रवाना

  बेळगाव : इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यावरच आपण परदेशी जातो, नोकरी करतो असा समज बाळगतो. पण मातृभाषेतून शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी परदेशी जाता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कु. प्रतीक्षा भादवणकर. भारत नगर 6 वा क्रॉस शहापूर, येथील कु. प्रतीक्षा पांडुरंग भादवणकर ही मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली विद्यार्थीनी एमएससी उच्चशिक्षण …

Read More »

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. प्रभाकर कोरे यांचे किरण जाधव यांच्याकडून गौरव

  बेळगाव : आरोग्य क्षेत्राबरोबरच देशाच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ. प्रभाकर कोरे यांना केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सन्मानानिमित्त भाजप नेते किरण जाधव यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी बोलताना भाजप नेते किरण जाधव म्हणाले की, …

Read More »

तिरंग्याखाली उमलले देशप्रेम… शिस्त, समर्पण आणि संकल्प

  खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय व ताराराणी हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. २६ जानेवारी हा दिवस भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून वाटचाल सुरू केल्याची साक्ष देणारा असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले. राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे ज्येष्ठ …

Read More »

चोरी आणि दरोड्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी बेळगावमध्ये “लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम” सुरू

  बेळगाव : चोरी आणि दरोड्यांच्या वाढते प्रकारावर आळा घालण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी “लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम” नावाची एक नवीन सुरक्षा व्यवस्था सुरू केली आहे. शहराबाहेर जाणारी कोणतीही व्यक्ती त्यांचा पत्ता, स्थान पिन आणि अनुपस्थितीचा कालावधी शहर पोलिस नियंत्रण कक्षाला दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे पाठवू शकतात. नियंत्रण कक्ष: माहिती व्हाट्सअपद्वारे ८२७७९५११४६ …

Read More »

संजीवीनी फाउंडेशनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

  बेळगाव : संजीवीनी फाउंडेशनच्या आदर्श नगर येथील काळजी केंद्रात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ओरिओनिस प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे सीईओ टी. आर. पालकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणत देशप्रेमाची भावना …

Read More »

“मेंढरांच्या पाठीमागे राहूनही स्वप्नांपर्यंत पोहोचता येते, फक्त जिद्द हवी!”

  बेळगाव : श्री. आर. एम. चौगुले व श्री मातोश्री सौहार्द सोसायटी, मण्णूर पुरस्कृत कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमालेचा समारोप समारंभ हिंडलगा येथे अत्यंत प्रेरणादायी, उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. हा समारोप केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारा ठरला. ज्ञान, अनुभव, …

Read More »

श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

  खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्राथमिक व हायस्कूलच्या वतीने गावामध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. प्रथमता प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण श्री. विकास मिराशी, तर हायस्कूलचे ध्वजारोहण माजी सैनिक व माजी विद्यार्थी श्री. सुरेश पवार यांच्या हस्ते …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या शिक्षिका मुक्ता आलगोंडी उपस्थित होत्या. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला प्रमुख पाहुणे मुक्ता आलगोंडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

  बेळगाव : पूर्वीपासूनच खो- खो हा खेळ येळ्ळूर गावची परंपरा आहे आणि ही परंपरा विद्यार्थ्यांनी सातत्याने सुरू ठेवावी. यशस्वी होण्यासाठी बौद्धिक व शारीरिक क्षमता ही तेवढीच महत्त्वाची आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या सदृढ राहणे तेवढेच महत्त्वाचे आहे, असे गौरव उद्गार संस्थापक श्री. वाय. एन. मजुकर यांनी क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन …

Read More »

“बेळगाव वार्ता”च्या रायगड जिल्हा प्रतिनिधींनी केले “मराठी सन्मान यात्रे”चे स्वागत

  महाड (रायगड) : रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पत्रकार नरेश पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमभागचे अध्यक्ष शुभम शेलके यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. पत्रकार नरेश पाटील हे “बेळगाव वार्ता”चे महाराष्ट्रातील रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. मूळचे बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील …

Read More »