Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

४ वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरण; पोक्सोअंतर्गत आरोपीला २० वर्षांची शिक्षा

  खानापूर : नंदगडमध्ये ४ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६८ वर्षीय नराधमाला न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजारांचा दंड ठोठावला आहे. ही संतापजनक घटना २४ फेब्रुवारी २०२४ रोजी नंदगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. निसार अहमद फक्रू साब चापगावी (वय ६८, रा. काकर गल्ली, नंदगड) याने चॉकलेटचे आमिष …

Read More »

युवा नेते शुभम शेळके यांच्यावरील कारवाईबाबत कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने निवेदन

  कोल्हापूर : कोल्हापूर येथे एकीकरण समिती बेळगावचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावरील कारवाईबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख हाजी असलम सय्यद (हातकणंगले लोकसभा), उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, संभाजी भोकरे, वाहतूक सेना अध्यक्ष हर्षल पाटील, कामगार सेना अध्यक्ष राजू सांगावकर, तालुकाप्रमुख दिलीप …

Read More »

सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा मुद्दा संसदेत

    नवी दिल्ली : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हद्दपारीची मुद्दा आता थेट लोकसभेत पोहोचला असून, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. बेळगाव सीमाभागात मराठी भाषिकांविरोधात होत असलेल्या कारवायांवरून वातावरण तापले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते …

Read More »

हुतात्मा स्मृती भवनाच्या उभारणीवर कर्नाटक प्रशासनाकडून आडकाठी?

  बेळगाव : 1 जून 1986 रोजी झालेल्या कर्नाटक -महाराष्ट्र सीमावादाच्या आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे भव्य हुतात्मा “स्मृती भवन” उभारण्यात येणार आहे. मात्र मराठीची कावीळ असलेल्या काही कन्नड संघटनांचे म्होरके कर्नाटक प्रशासनाला हाताशी धरून या हुतात्मा स्मृती भवनाच्या उभारणीवर आडकाठी घालत आहेत. नुकताच …

Read More »

एस.आर.एस. हिंदुस्थान अनगोळने पटकावला धर्मवीर चषक -2025

  बेळगाव : पिरनवाडी येथील सनसेट वॉरियर्स यांच्यातर्फे आयोजित धर्मवीर चषक -2025 भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद एस. डी. लायन्स पिरनवाडी संघाला पराभूत करत एस. आर. एस. हिंदुस्थान अनगोळ संघाने पटकावले. पिरनवाडी येथे सदर क्रिकेट स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेच्या मर्यादित 5 षटकांच्या अंतिम सामन्यात एस. डी. लायन्स …

Read More »

सात महिन्यापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह सापडला भूतनाथ डोंगरावर!

  खानापूर : गेल्या सात महिन्यापासून बेपत्ता असलेले झाडअंकले येथील रहिवासी मारुती उसुरलकर (वय वर्षे 75) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत भूतनाथ येथील डोंगरावर सांगाड्याच्या स्वरूपात सापडला आहे. मृतदेहाची प्राथमिक ओळख त्यांच्या मृतदेह शेजारी असलेल्या चप्पल, छत्री व गळ्यातील वारकरी माळ यावरून पटविण्यात आली आहे. मात्र सरकारी नियमाप्रमाणे डीएनए परीक्षण …

Read More »

गाडीकोप खून प्रकरणाचा २४ तासात छडा : आरोपीला शिवमोग्गातून अटक

  खानापूर : बेळगावमधील खानापूर तालुक्यात दगडाने ठेचून करण्यात आलेल्या भीषण हत्येप्रकरणी पोलिसांनी शिवमोग्गा मधून एका आरोपीला अटक केली आहे. बलोगा, तालुका खानापूर येथील शिवनगौडा इरनगौडा पाटील (वय ४७) या इसमाची दगडाने ठेचून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. सदर व्यक्तीचा मृतदेह खानापूर ते एम. के. हुबळी रस्त्यावरील गडीकोप गावानजीक असणाऱ्या …

Read More »

सीमाभागातील बहुआयामी व्यक्तीमत्त्व श्री. वाय. एन. मजुकर सर

  कर्तृत्वशाली नेतृत्वाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले येळ्ळूरचे सुपुत्र आणि सीमाभागातील सामाजिक, राजकीय, चळवळीतील बहुआयामी व्यक्तीमत्त्व लाभलेले श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक -अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुर सर यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त थोडक्यात….. बेळगावातील येळ्ळूर हे क्रांतिकारकांचे, शिक्षण-संस्थापकांचे, शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावी सरांचा जन्म एका गरीब …

Read More »

विद्युत तारेच्या स्पर्शाने इदलहोंड येथे 9 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

  खानापूर : विद्युत तारेच्या स्पर्शाने 9 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे घडली. बुधवारी (2 एप्रिल) सायंकाळी 5.45 वाजता ही दुर्घटना घडली. मनाली मारुती चोपडे (वय 9) असे मृत मुलीचे नाव आहे. इदलहोंड आणि सिंगिनकोप या लागून असलेल्या गावांजवळ मारुती चोपडे यांचे घर आहे. त्यांच्या …

Read More »

खानापूर तालुक्यातील गाडीकोप येथे एकाचा दगडाने ठेचून खून

  खानापूर : खानापूर – एम. के. हुबळी मार्गावरील गाडीकोप रस्त्याला लागून असलेल्या शेतवडीत खानापूर तालुक्यातील बलोगा येथील शिवनगौडा इरनगौडा पाटील (वय 48) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना काल दिनांक 1 एप्रिल रोजी घडली आहे. मयत शिवनगौडा याचा भाऊ सन्नगौडा पाटील यांनी याबाबत खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दिली …

Read More »