Monday , July 27 2026
Breaking News

Belgaum Varta

कारमध्ये बसून एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

  पंचकूला : हरियाणाच्या पंचकूलामध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने कारमध्ये बसून विष प्राशन करुन आपले जीवन संपवले. पोलिसांनी सात मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आजोबा, आई-वडिल आणि मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्व सातही मृतदेहांच पोस्टमार्टम करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. …

Read More »

अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडले; सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

  बीड : बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना …

Read More »

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मुलासह पाच जणांना ठोकल्या बेड्या

  पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. त्यांनी पलायन केले त्यावेळी त्यांना काही जणांनी मदत केली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. …

Read More »

आता मालमत्ता नोंदणीसाठी ई-स्वाक्षरी अनिवार्य

  बंगळूर : आता यापुढे मालमत्ता नोंदणीसाठी ई-स्वाक्षरी अनिवार्य असेल. आजपासून, मालमत्ता किंवा इतर नोंदणी प्रक्रियेसाठी इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी अनिवार्य आहे. या संदर्भात, महसूल विभागाने कर्नाटक मुद्रांक सुधारणा कायदा लागू करणारा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, कोणत्याही नोंदणी प्रक्रिया डिजिटल केल्या जातील. या कायद्याने प्रक्रियेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत विक्री करारांसह सर्व प्रकारच्या …

Read More »

मुसळधार पावसामुळे बेळगाव-चोर्ला महामार्ग बंद; खानापूर- जांबोटी मार्गाने वाहतूक वळवली

  खानापूर : खानापूर तालुक्यात पावसामुळे मलप्रभा नदीला पूर आला आहे. कणकुंबी येथे असलेल्या मलप्रभा नदीच्या उगमस्थानाजवळ, कुसमळी गावाजवळ एका नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि बांधकामाधीन भागातील तात्पुरता मातीचा रस्ता पूर्णपणे खचून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. हा रस्ता जांबोटी …

Read More »

मुलांसाठी सुट्टी, गर्भवती महिला, वृद्धांसाठी मास्क अनिवार्य

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निर्देश: कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना बंगळूर : राज्यात कोविड-१९ चे रुग्ण वाढत असताना सर्व गर्भवती महिला, वृद्ध आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांनी मास्क घालावेत. शाळेत येणाऱ्या मुलांना ताप, खोकला आणि इतर कोविड लक्षणे आढळल्यास अशा मुलांना सुट्टी देऊन घरी पाठवावे, अशा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कडक सूचना दिल्या आहेत. …

Read More »

आनंद नगरातील समस्यांची महापौर मंगेश पवार यांच्याकडून पाहणी

  अधिकाऱ्यांना केल्या स्वच्छता व समस्या सोडविण्याच्या सूचना वडगाव : अनगर दुसरा क्रॉस येथील नाल्याच्या अपूर्ण कामाचा येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. नाल्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे नाल्यात कचरा व दुर्गंधीयुक्त पाणी तुंबून राहत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, दुर्गंधीत पाणी तुंबून राहिल्यामुळे परिसरातील विहिरीमध्ये सुद्धा नाल्याचे पाणी झिरपत …

Read More »

वैद्यकीय महाविद्यालयाकडून १० लाखांची लाच घेणाऱ्याला एनएमसीच्या वरिष्ठ डॉक्टरला अटक

  बेळगाव : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) मध्ये मूल्यांकनकर्ता म्हणून काम करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरला बेळगाव येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधींकडून १० लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. बेळगाव येथील वैद्यकीय संस्थेच्या अनुकूल तपासणी अहवालाच्या बदल्यात ही लाच देण्यात आल्याचा आरोप आहे. बेकायदेशीर व्यवहार झाल्यानंतर सीबीआयने तातडीने …

Read More »

तानाजी गल्ली रस्ता वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करा

  बेळगाव : तानाजी गल्ली येथील रेल्वे ट्रॅकवरील रस्ता वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे मंडळाने बंद केल्यामुळे स्थानिक रहिवाशांकडून तीव्र विरोध होत आहे. हा रस्ता तात्काळ वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. तानाजी गल्लीचा हा रस्ता बंद केल्यामुळे परिसरातील दुकानदारांना, शाळकरी मुलांना आणि सामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या …

Read More »

कॉलेज रोडवर पार्क केलेल्या ३ कार आणि १ दुचाकींना इनोव्हा कारची धडक

  बेळगाव : लिंगराज अरस कॉलेज रोड हॉस्पिटलसमोर काल मध्यरात्री दीडच्या सुमारास गोवा पासिंग एका कारने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन कार आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली, यात सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोवा पासिंगची इनोव्हा कार भरधाव वेगाने …

Read More »