बेळगाव : शहरातील क्लब रोडवरील वनिता विद्यालय या शाळेत विद्यार्थ्यांची वार्षिक फी कोणतीही पूर्वसूचना न देता वाढवल्यामुळे शाळा प्रशासनावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळेच्या वार्षिक निकालाच्या दिवशी सदर ही वाढीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे शाळेत पालकांचा एकच गोंधळ उडाला. अचानकपणे केलेल्या फी वाढच्या घोषणेमुळे पालक संतप्त झाले. …
Read More »मानव जातीच्या कल्याणासाठी जैन समाजातर्फे निपाणीत नवकार महामंत्राचा जागर
निपाणी (वार्ता) : जैन समाजातर्फै देशात अनेक ठिकाणी नवकार महामंत्राचे आयोजन करण्यात आले होते. वैश्विक शांतता, मानवजातीचे कल्याण, परस्परांतील स्नेहभाव वाढवणे आणि आध्यात्मिक उन्नती साधणे या उद्देशाने हा महामंत्र जप कार्यक्रम सर्वत्र पार पडला. त्यानुसार निपाणीतही व्यंकटेश्वर मंदिरात नवकार महामंत्राचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. जैन समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध ५०० कोटींचा किकबॅक आरोप
खटल्याला परवानगीसाठी राज्यपालांकडे अर्ज बंगळूर : मुडा घोटाळ्याच्या चौकशीला सामोरे जात असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. खाण कंत्राट नूतनीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी ५०० कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते राममूर्ती गौडा यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना लाच …
Read More »कळसा भांडुरा प्रकल्पाला विरोध करण्याचा खानापूर येथील बैठकीत निर्धार
खानापूर : खानापूर तालुक्यातील असोगा, रूमेवाडी, करंबळ, तसेच इतर गावातील शेतकऱ्यांना जमीन स्वाधीकरणाबाबत कर्नाटक सरकारने नोटीस पाठवली आहे. कळसा-भांडुरा प्रकल्पाद्वारे धारवाड जिल्ह्यातील गावाना पाणी पुरवण्यासाठी जी योजना केली आहे. या योजनेमुळे खानापूरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी व पाऊस यांची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. त्यासाठी आज बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी, …
Read More »आत्महत्या करायला गेला पण दोन्ही पायच गमावून बसला!
गोकाक : गोकाकमध्ये एक युवक आत्महत्या करण्यासाठी गेला पण त्याला दोन्ही पाय गमवावे लागले. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक रोड रेल्वे स्थानकाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली आहे. शिंदीकुरबेट गावचा होळेप्पा हुलकुंद नावाच्या युवकाने रेल्वे रुळावर स्वतःला झोकून देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तो वाचला, मात्र त्याचे दोन्ही पाय निकामी झाले …
Read More »आम्ही सदैव सीमावासीयांच्या पाठीशी : शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांची ग्वाही
बेळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांची बेळगावला धावती भेट. बेळगावात चाललेल्या एकंदर प्रकारावर सविस्तर चर्चा झाली. मराठी माणसांवर बेळगाव प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाबद्धल त्यांना माहिती दिली. त्याचबरोबर हिंडलगा येथे होणाऱ्या हुतात्मा स्मारकाच्या कामात लाल पिवळ्या संघटना बेळगाव प्रशासनावर दबाव घालून आडकाठी आणत आहेत. …
Read More »मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचा बारावी वार्षिक निकालात तालुक्यात वरचष्मा!
खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे विद्यार्थ्यांच्या सर्वगुणसंपन्नत्तेवर भर देणारे नामांकित महाविद्यालय असून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमात अग्रेसर असतात हे आपण नेहमीच वर्तमान पत्रात व सोशल मेडियावर पहात असतो. येथील विद्यार्थिनी अभ्यासातही आपला रूबाब राखून आहेत. गेले अनेक वर्षे इयत्ता बारावी …
Read More »निपाणीत शुक्रवारपासून दुसऱ्या पर्वातील अरिहंत चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह, सहकाररत्न उत्तम पाटील आणि निपाणीतील छत्रपती शिवाजी नगरातील फ्रेंडस सर्कलतर्फे शुक्रवार पासून (ता.११) दिवंगत सहकार रत्न रावसाहेब पाटील यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त अरिहंत चषक- २०२५ दुसऱ्या पर्वातील अखिल भारतीय दिवस रात्र खुल्या फुल्ल स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. …
Read More »आठ-दहा युवकांच्या टोळक्याकडून प्राणघातक हल्ला…
बेळगाव : क्षुल्लक कारणामुळे 25 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अनगोळ येथे घडली. यामध्ये शिवराज तानाजी मोरे रा. कामत गल्ली हा गंभीर जखमी झाला आहे. शिवराज मोरे हा युवक कोनवाळ गल्लीतील एका ‘स्पेअर स्पार्टच्या दुकानात काम करतो. आठ-दहा युवकांच्या टोळक्याने दुकानात शिरून शिवराजला …
Read More »महामेळावा खटल्यासंदर्भात पोलिसांची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण
बेळगाव : कर्नाटक अधिवेशनाला प्रतिउत्तर म्हणून सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळावा घेण्यात येतो. २०१८ मध्ये झालेल्या महामेळाव्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहा जणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते. त्या संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयाच्या चतुर्थ न्यायालयात खटला सुरू असून दिनांक ८ एप्रिल रोजी यासंदर्भात पोलिसांची साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी २४ एप्रिल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta