Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

जनतेला आर्थिक शक्ती देणे हाही एक विकासच : सिध्दरामय्या

  पुण्यतिथीनिमित्त पं. नेहरूना अभिवादन, मोदींवर हल्लाबोल बंगळूर : लोकांना सामाजिक आणि आर्थिक शक्ती देणे हा देखील विकास आहे. केवळ रस्ते, पूल आणि सिंचन बांधणे म्हणजे विकास नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. केपीसीसी कार्यालयात देशाचे माजी पंतप्रधान डॉ. पंडित जवाहरलाल …

Read More »

राजद्रोहाच्या गुन्ह्यातून ३५ शिवभक्तांची निर्दोष मुक्तता!

  बेळगाव : २०२१ साली बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबनेबाबत बेळगावमध्ये शिवभक्तांच्या वतीने धर्मवीर संभाजी चौकात निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. यादरम्यान खडेबाजार पोलिसांनी एकूण ४८ जणांवर राज्यद्रोहाच्या गुन्ह्याखाली तक्रार दाखल केली होती. यापैकी एकूण ३५ जणांनी आपल्यावर खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाकडे अर्ज …

Read More »

महाराष्ट्रातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी बंद करण्याचा प्रयत्न

  कागवाड : महाराष्ट्रातून राजापूर बॅरेजमधून कर्नाटकातील कृष्णा नदीला सोडण्यात येणारे पाणी महाराष्ट्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. कागवाड तालुक्याच्या कर्नाटक संरक्षण मंचाचे तालुका मानद अध्यक्ष शिवानंद नवीनाळ यासंदर्भात बोलताना म्हणाले की, प्रत्येक उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मे महिन्याच्या अखेरीस कृष्णा नदीत पाणी नसल्याने उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना …

Read More »

अन्नपूर्णेश्वरी देवी वर्धापन दिन बुधवारपासून

  बेळगाव : वडगाव अन्नपूर्णेश्वरीनगर येथील श्री अन्नपूर्णेश्वरी देवीचा ११ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. बुधवार दि. २९ पासून सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. तरी भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बुधवार दि. २९ रोजी पहाटे ६ वाजता अन्नपूर्णेश्वरी …

Read More »

हडलगा येथे बसची सोय करा; विद्यार्थी, समितीची मागणी

  खानापूर : हडलगा येथे बस फेरी सुरू करावी याचे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून खानापूर डेपो मॅनेजरना आज निवेदन देण्यात आले. हडलगा ता. खानापूर येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी काल एक व्हिडिओ प्रसारित करून सरकारी बसची मागणी केली होती, याची दखल खानापूर म. ए. समिती व युवा समिती खानापूर यांनी घेत …

Read More »

उचगाव श्री मळेकरणी देवस्थान परिसरात यात्रा करण्यावर बंदी

  उचगाव : उचगाव मळेकरणी देवस्थानमध्ये यापुढे पशुबळी देण्याच्या प्रथेला निर्बंध घालण्यात आले असून उचगाव आणि परिसरात कोणालाही देवीच्या नावाने बकऱ्याला बळी देऊन मांसाहारी जेवणावळी, यात्रा करता येणार नाही. जर कोणी असे केल्यास त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवार दिनांक 27 मे रोजी उचगाव ग्रामपंचायत, देसाई …

Read More »

प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी एसआयटी चौकशीसाठी राहणार हजर

  बंगळुरू : प्रज्वल रेवण्णा एका महिन्यानंतर दिसला आहे. परदेशात लपून बसलेल्या प्रज्वलने एक व्हिडिओ जारी केला असून तो ३१ मे रोजी एसआयटी तपासासाठी येणार असल्याचे सांगितले आहे. देशभरात प्रचंड चर्चेचा विषय असलेले हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा महिनाभरानंतर हजर झाले आहेत. २६ एप्रिल रोजी मतदान करून परदेशात गेलेले खासदार प्रज्वल …

Read More »

३१ मे पासून होणार नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

  बेळगाव : उन्हाळी सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार असल्याने सर्व शाळांचे आवार शुक्रवारपासून (दि. ३१) गजबजणार आहेत. सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके १ जूनपर्यंत देण्याचा प्रयत्न केला जाणार असून गणवेशाचे कापड १५ जूननंतर दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली. शाळा ३१ मे रोजी सुरू होणार असल्या तरी …

Read More »

पापुआ न्यू गिनीमध्ये भीषण दुर्घटना; दरड कोसळून २००० हून जास्त लोकांचा मृत्यू!

  इंडोनेशियाच्या सीमेला लागून असलेल्या पापुआ न्यू गिनीमध्ये शुक्रवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांची संख्या २०००च्या वर गेली आहे. शुक्रवारी पापुआ न्यू गिनीमधील एंगा प्रांतातल्या यांबली गावात मोठी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. दरड कोसळल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. ही दरड एवढी मोठी होती की त्यातून खाली आलेल्या मलब्याखाली …

Read More »

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा; तालुका म. ए. समितीचे आवाहन

  बेळगाव : १ जून रोजी सकाळी ८.३० वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात कन्नडसक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे ठरले. तर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी ४ जून नंतर व्यापक बैठक घेण्याचा निर्णयही रविवारी (दि. २६) मराठा मंदीर सभागृहात झालेल्या बैठकीत आला. १९८६ मध्ये कर्नाटक सरकारने कन्नडसक्ती लागू केली. …

Read More »