वडोदरा : गुजरातच्या वडोदरा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील हर्णी तलाव विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली. या हृदयद्रावक घटनेत दोन शिक्षकांसह 12 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 15 जणांची कॅपेसिटी असलेल्या बोटीवर न्यू सनराइज स्कूलचे 25-27 विद्यार्थी बसवले होते. यावेळी त्यांना लाईफ जॅकेदेखील घातले नव्हते. या घनटेची माहिती …
Read More »येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न
येळ्ळूर : ज्यांच्याकडे शारीरिक तंदुरुस्ती आहे तोच आजच्या काळात खरा श्रीमंत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी व्यसनापासून दूर राहून सदृढ आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे असे उद्गार वेदांत को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक व निवृत्त शिक्षक श्री. जयवंत खन्नूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले. सन 2023-24 शैक्षणिक वर्षातील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉ. एन. डी. पाटील यांना अभिवादन
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक 17 जानेवारी रोजी भाई एन. डी. पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये प्रथमता एन. डी. पाटील यांच्या फोटोचे पूजन शाळेच्या शिक्षिका रेणू सुळकर व मंजुषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर भाई एन. डी. पाटील यांच्या …
Read More »लक्ष्मण चिंगळे यांची कागिनेले गुरूपीठ महासंस्थान विश्वस्त मंडळाच्या ट्रस्टी पदी नियुक्ती
निपाणी (वार्ता) : कागिनेले महासंस्थान गुरुपीठ महासंस्थान कनक गुरुपीठ कागिनेले विश्वस्त पदाची निवड सन-१९९२ नंतर प्रथमच महासंस्थान विश्वस्त मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. कागिनले महासंस्थान येथे बैठक होऊन अधिकृतपणे उपनोंदणी कार्यालय ब्याडगी येथे जगद्गुरू श्री निरंजना नंदपुरी स्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त संस्थांची अधिकृत नोंदणी करण्यात आली. यामध्ये कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री …
Read More »इंधन टँकरखाली सापडल्याने वृद्ध महिलेचे दोन्ही पाय निकामी
बेळगाव : खानापूर रोड गोवावेस सर्कल येथे आज सकाळी दहाच्या सुमारास मुस्लिम गल्ली अनगोळ बेळगाव येथील सुरया सय्यद (वय 79) ही महिला रस्ता ओलांडत असताना येणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या केए 22 /1695 क्रमांकाच्या इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरच्या चाकाखाली सापडली. या अपघातात सदर महिलेचे दोन्ही पाय गुडघ्यापासून निकामी झाले. हा अपघात …
Read More »मणतुर्गा हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ
खानापूर : मणतुर्गा ता.खानापूर येथील चांगळेश्वरी शिक्षण संस्था येळ्ळूर संचलित मणतुर्गा हायस्कूल मणतूर्गा यांच्या वार्षिक क्रीडामहोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला, या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार हे होते, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकवण्यात आला तर क्रीडामशाल हेब्बाळकर कन्स्ट्रकशनचे किशोर हेब्बाळकर यांच्या …
Read More »22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान ऑटो एक्स्पो 24 व बेल्कॉन प्रदर्शन
बेळगाव : 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान 4 दिवस सातवे क्रेडाई बेळगाव बेल्कॉन गृहनिर्माण व ऑटो एक्स्पो-2024 प्रदर्शन बेळगावी येथील सी पी एड मैदानावर होणार असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संबोधित करताना अध्यक्ष दीपक गोजगेकर म्हणाले की, यश इव्हेंट्स, बेलागावी कॉस्मो राऊंड टेबलच्या सहकार्याने, …
Read More »19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीराम पवार यांची निवड
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित 19 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार (ता. 11) फेब्रुवारी 2024 रोजी श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक, लेखक, स्तंभलेखक राजकीय विश्लेषक व सकाळ माध्यम समूहाचे श्रीराम पवार यांची निवड करण्यात आली आहे. श्रीराम …
Read More »कोगनोळीत अज्ञात चोरट्यांचा चोरीचा डाव फसला
चोर सीसीटीव्ही मध्ये कैद : सर्वत्र घबराटीचे वातावरण कोगनोळी : येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या दुकानात चोरी करण्याच्या प्रेयत्नात असणाऱ्या चोरट्यांचा डाव फसल्याची घटना रविवार, सोमवारी पाहटे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील मुख्य रस्त्यावर किरण चव्हाण यांचे अदित्य बाजार आहे. सोमवारी किरण चव्हाण नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून …
Read More »घुमटमाळ मारुती मंदिराचा साफसफाई कार्यक्रम
बेळगाव : जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे त्याला अनुसरून सर्वत्र स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जात आहेत. हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर मध्ये ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुनिल चौगुले आणि अनंत लाड यांच्या पुढाकाराने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta