Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून अपंग मुलीला सायकलचे वितरण

  बेळगाव : आनंदवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या किशोरी पवार यांची 9 वर्षीय कन्या सिद्धी पवार ही मुलगी इयत्ता तिसरी वर्गात शिकत असून जन्मल्यापासून ती अपंग आहे. तिला चालता येत नाही. किशोरी या आपल्या मुलीला शाळेला रोज कडेवर घेऊन आणतात आणि सोडतात. हे दृश्य समाजसेविका माधुरी जाधव यांच्या निदर्शनास आले. माधुरी …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट

  शिरूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज उत्तर कन्नड जिल्ह्यातील विविध भागात पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. मुख्यमंत्री रविवारी सुट्टीच्या दिवशीही विश्रांती न घेता जिल्हा दौऱ्यावर गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, त्यांनी कारवार जिल्ह्यातील शिरुर येथील दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच …

Read More »

खानापूर तालुक्यात पावसाची संततधार सुरूच; चापगाव येथे अनेक घरांची पडझड

  खानापूर : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस रविवारीही कायम होता. कणकुंबी, जांबोटी, भीमगड, लोंढा, नागरगाळी वनपरिक्षेत्रात नेहमीप्रमाणे पाऊस सुरू असून संततधार पावसामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. भीमगड अभयारण्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे भांडुरी  भरला आहे. त्यामुळे देगाव-हेमाडगा आणि पाली-मेंडील गावांमधील रस्ता आणि पुलावरून अनेक फूट पाणी वाहत आहे. …

Read More »

बेळगाव, खानापूर तालुक्यातील शाळा, कॉलेजला 22 व 23 रोजी सुट्टी

  बेळगाव : बेळगाव, खानापूर परिसरात सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 34 (एम) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत, सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या आणि पदवीधरपूर्व (12 वी पर्यंत) बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यात खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार दिनांक 22 व मंगळवार …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी केला खानापूर तालुक्यातील विविध भागांचा पाहणी दौरा

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. खानापूर तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन सद्यस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि नदी-नाल्यांची पाणी पातळी तपासली. तालुक्यातील कुसमळी गावातील पुलाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी …

Read More »

गुरुपौर्णिमेनिमित्त कंग्राळ गल्ली येथे आयुष्यमान कार्डची नोंदणी

  बेळगाव : आज कंग्राळ गल्ली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयुष्यमान कार्डची विनामूल्य नोंदणी करण्यात आली. गल्लीतील सर्व नागरिकांना याचा लाभ मिळावा या उद्देशाने गल्लीतील युवकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गल्लीतील पंचमंडळीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. शंकर बडवाण्णाचे, …

Read More »

‘आयटी कर्मचाऱ्यांनी १४ तास काम करावे’, कर्नाटकच्या प्रस्तावावर कामगार संघटनाची नाराजी

  बंगळुरू : कर्नाटक हे आयटी कंपन्यांचे हब मानले जाते. बंगळुरूमध्ये अनेक आयटी कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. जगभरातील आयटी प्रोफेशनल याठिकाणी काम करतात. आता कर्नाटकमधील आयटी कंपन्यांचा एक निर्णय वादात अडकला आहे. येथील आयटी कंपन्यांनी कर्नाटक सरकारला कर्मचाऱ्यांचा कामाचा दिवस १४ तासांचा करण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावाचा आता कामगार …

Read More »

प्रगती इंजिनिअरिंगमध्ये वृक्षारोपण

  बेळगाव : सामाजिक आणि निसर्गाप्रती असणारी जाणिव राखत प्रगती इंजिनिअरिंग बेळगाव प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कामगार आणि ग्रीन सेविअर बेळगाव यांनी वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात वनमहोत्सव साजरा केला. रविवारी स्वदेशी 60 पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. त्यावेळी ग्रीन सेविअर ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. जयंत लिंगडे सर तसेच प्रगती इंजीनियरिंगचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. …

Read More »

कर्नाटकातील काही जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जाहीर

  बंगळुरू : कर्नाटक राज्यात पावसाचा जोर कायम आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे डोंगराळ भागात परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पाऊस सतत पडत असून 21 आणि 22 जुलै रोजी हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. किनारपट्टी आणि पर्वतीय भागात …

Read More »

अलमट्टीतून १ लाख क्युसेक विसर्ग सुरु; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  सांगली : सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कृष्णानदीसह वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे. सांगलीच्या चांदोली धरण …

Read More »