निपाणी (वार्ता) : निपाणीहून सुळगावला जाण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता बस आहे. पण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घरी पोहचण्यास रात्री उशिरा होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी वरील वेळेऐवजी सायंकाळी ५:१० वाजता बस सोडून सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते आगार प्रमुख संगाप्पा यांना …
Read More »श्री चांगळेश्वरी युवक मंडळातर्फे आदित्य आनंद पाटील याचा सत्कार
बेळगाव : येळ्ळूर येथील कु. आदित्य आनंद पाटील याने 2024 मध्ये झालेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग परीक्षेत 95% गुण मिळवून जैन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम तसेच, विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातून कर्नाटक राज्यात सुवर्णपदकासह चौथा क्रमांक पटकावल्याबद्दल चांगळेश्वरी युवक मंडळ यांच्यातर्फे 21-07-2024 रोजी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, उद्योजक एन. डी. …
Read More »पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली!
पाणी पातळीत वाढ होत राहिल्यास नागरिकांनी वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून आज ही पाणी पातळी 39 फुटाच्या वर …
Read More »कॅपिटल वनतर्फे ओमकार शाम सुतार यांचा सत्कार
बेळगाव : नुकत्याच झालेल्या सी. ए. परीक्षेमध्ये घवघवित यश संपादन केलेल्या संस्थेचे संस्थेचे सभासद ओमकार शाम सुतार यांचा नुकताच संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून ओमकार यांचे अभिनंदन केले. आपल्या जिज्ञासू वृत्तीमुळेच कु.ओमकार याने हे यश संपादन केले असेही नमूद करून भविष्यात …
Read More »येळ्ळूरमधील समस्या सोडवण्यासाठी आमदार अभय पाटील यांना नागरिकांचे निवेदन
येळ्ळूर : येळ्ळूर गावामधील समस्या तात्काळ सोडवाव्यात यासाठी सिद्धेश्वर गल्ली येळ्ळूर येथील नागरिकांनी बेळगाव दक्षिण दक्षिण भागाचे आमदार अभय पाटील यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सिद्धेश्वर गल्लीच्या समोर असलेला येळ्ळूरमधील महत्त्वाचा चौक म्हणजे लक्ष्मी चौक होय. या चौकात सर्वत्र पेव्हर्स बसवून या चौकाचे सुशोभीकरण करावे, तसेच सिद्धेश्वर …
Read More »नियती फाऊंडेशनतर्फे खानापूर न्यायालयात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण
खानापूर : नियती फाऊंडेशन आणि गुरुदेव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 22 जुलै रोजी खानापूर न्यायालय आवारात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेएमएफसी प्रधान दिवाणी न्यायाधीश विरेश हिरेमठ हे उपस्थित होते. यावेळी बसवराज हपळ्ळी, ऍड. आर. एन. पाटील यांच्यासह वकील वर्ग, …
Read More »चारित्र्याच्या संशयावरून मुडलगी तालुक्यात एकाचा निर्घृण खून
मुडलगी : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील लक्ष्मीश्वर गावात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसह एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मौलासाब यासीन मोमीन (28) हा आपल्या दुचाकीवरून शिल्पा नामक महिलेला घेऊन जात असताना शिल्पाचा पती …
Read More »ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच दत्त कारखान्याचा ध्यास
सदलगा शहरातील प्रचार सभेत माननीय उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे मत सदलगा : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिरोळच्या २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांसाठी २४ जुलै रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी काल सदलगा शहरातील महादेव मंदिराच्या अक्कमहादेवी कल्याण सभा मंडपात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांच्या समवेत प्रचार सभा …
Read More »संभाव्य पुराच्या धोक्यामुळे शेकऱ्यांकडून जनावरे सुरक्षित स्थळी स्थलांतरित
चिक्कोडी : महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा पाणी पातळीत वाढ झाली आहे. एकसंबा परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एकसंबा -दत्तवाड परिसरातील शेतकरी आपली जनावरे अन्यत्र सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा, दुधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे …
Read More »हुबळी येथील वैष्णवी देवी मंदिराच्या पुजाऱ्याची भीषण हत्या
हुबळी : हुबळी ईश्वर नगर येथील वैष्णवी देवी मंदिराच्या पुजाऱ्याची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नागरिकांतून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैष्णव देवी मंदिराचे पुजारी देवप्पाज्जा यांचा अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या वर्षी देखील एका पुजाऱ्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला होता. पण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta