Sunday , September 20 2026
Breaking News

प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड

Spread the love

 

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने सतत लोकांना हसवणारे हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. त्याने वयाच्या ५७ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. त्यांनी आजवर अनेक विनोदी मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. अतुल परचुरे यांना गेल्या वर्षी कॅन्सरची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यांनी स्वतः याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती.

मिळलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते कॅन्सर आजराशी झुंज देत होते. त्यावर उपचार घेत होते. यातच मधल्या काळात त्यांची प्रकृती स्थिर झाली होती.

यानंतर ते पुन्हा कामावरही रुजू झाले होते. सध्या सूर्याची पिल्ले या नाटकासाठी रिहर्सल करत होते. या नाटकासाठी ते खूप उत्सुक होते. या सगळ्यातच अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी आता समोर आली आहे.

चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती आणखीनच बिघडली
गेल्या वर्षी अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना कॅन्सरची लागण झाली आहे. चुकीच्या उपचारांमुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्याच्या यकृतात 5 सेमीची गाठ झाली. त्याचवेळी ते कपिल शर्मा शोचा एक भाग होते. मात्र त्यांना आजारपणामुळे हा शो सोडावा लागला. तसेच आजारपणामुळे त्यांना कपिल शर्मासोबत अमेरिका टूरवरही जाता आलं नाही.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *