Sunday , July 26 2026
Breaking News

कोगनोळी दुधगंगा नदीमध्ये मगरीचा वावर

Spread the love

 

कोगनोळी : येथील दुधगंगा नदीमध्ये पिरमाळ लगत असणाऱ्या सुतारकीजवळ मनोहर सुतार यांच्या शेतालगत मगरीचा वावर आढळून आला असून नदीकाठावर शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
दोन दिवसांपासून दुधगंगा नदीमध्ये मगर दिसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती.
येथील शेतकरी प्रविण सुतार विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेले असता नदीपात्रात मगर दिसून आली. साडेचार ते पाच फूट लांबीची ही मगर आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी नदीकाठी बसवण्यात आलेल्या विद्युत मोटरी सुरू करण्यासाठी शेतकरी जात असतात. त्याचबरोबर नदीपात्राचे पाणी खाली गेल्याने विद्युत पंपाच्या पाईपला कचरा साफ करण्यासाठी नदीमध्ये उतरत असतात. येथील नदीमध्ये मगरीचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. संबंधित वन विभागाने मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *