बोरगाववाडीत रस्ते, गटार कामाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : ढोणेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून बोरगाव वाडी येथे रस्ता आणि गटार बांधकामासाठी निधी मंजूर झाला होता. या कामाचा प्रारंभ सहकाररत्न उत्तम पाटील*यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत …
Read More »अय्यप्पा स्वामी महोत्सवाचा उद्या विविध कार्यक्रमांनी समारोप
टिळकवाडी : आश्रय कॉलनी, नानावाडी येथील श्री अय्यप्पा सेवा समिती ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ५४ व्या वार्षिक ‘अय्यप्पा स्वामी महोत्सवा’चा समारोप येत्या रविवारी (ता. २८) विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. महोत्सवाची सुरुवात रविवारी (ता. २१) ध्वजवंदनाने झाली. त्यानंतर दररोज सकाळी उषा पूजा, सात ते अकरा या वेळेत विशेष पूजांचे …
Read More »सामाजिक कार्यकर्त्यांकडून धोकादायक गटाराची दुरुस्ती
महांतेशनगर : महांतेशनगर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी धोकादायक गटार असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली होती. या गटारामुळे दुचाकी, चारचाकी वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला होता. विशेष करून रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात गटार न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक होती. यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गटाराची दुरुस्तीआणि गटाराभोवती संरक्षक …
Read More »विज्ञान प्रदर्शन स्पर्धेतील विजेत्यांना युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्याकडून बक्षीस वितरण
विज्ञानाला प्राधान्य द्या : राहुल जारकीहोळी यमकनमर्डी : सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने दड्डी आणि हुनूर मास्तीहोळी क्लस्टरअंतर्गत येणाऱ्या वरिष्ठ प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी हुक्केरी तालुक्यातील अलदाळ गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बीडीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांनी रोख बक्षीस व …
Read More »श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे रविवारपासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एस.एस.एल.सी. व्याख्यानमाला
खानापूर : खानापूर तालुक्यातील श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या सौजन्याने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “एस.एस.एल.सी. व्याख्यानमाला 2025–26” चे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता श्री महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकट्टी येथे श्री. पी. रामाप्पा B.E.O, खानापूर …
Read More »आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ क्षेत्र विकासासाठी भरीव निधी देण्याची मंत्री यतीन्द्र सिद्धरामय्या यांची ग्वाही
निपाणी (वार्ता) : कर्नाटकाचे मंत्री यतीन्द्र सिद्धरामय्या यांनी आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ तीर्थक्षेत्राला शुक्रवारी (ता.२६) भेट दिली. यावेळी त्यांनी हालसिद्ध नाथांचे दर्शन घेऊन या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. मंत्री यतीन्द्र सिद्धरामय्या यांनी बेळगाव येथील अधिवेशनाचे काम आटोपून निपाणीमार्गे आप्पाचीवाडी येथील तीर्थक्षेत्राला भेट दिली. यावेळी …
Read More »देशाचे उज्वल भवितव्य शिक्षकांच्या हाती : ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांचा विश्वास
बेळगाव : शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञानच देत नसून, भावी पिढी आणि देशाचे भवितव्य घडविण्याचे काम करत असतात असे प्रतिपादन ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी बोलताना केले. आज शुक्रवारी सायंकाळी कॅम्प येथील बी.के मॉडल हायस्कूलच्या शताब्दी समारोहाच्या समारोप समारंभाराला, मराठा लष्करी प्रशिक्षण केंद्राचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्यासह सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते, …
Read More »क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अतुल शिरोळे भारतीय टीमचे कोच
बेळगाव : मुचंडी (ता. जि. बेळगाव) येथील आंतरराष्ट्रीय मल्ल पै. अतुल सुरेश शिरोळे यांची मलेशिया येथील क्वालालंपूरमध्ये येत्या 12 ते 17 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा–2026 साठी भारतीय कुस्ती संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. क्वालालंपूर येथे होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्प संघटना समिती तसेच …
Read More »येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी
येळ्ळूर : महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून खासदार धैर्यशील माने यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा व्यक्त करण्यात आला ब्रम्हलिंग मंदिरमध्ये येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने संघटना बळकटी संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत वरील ठराव करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. …
Read More »बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय- अत्याचाराच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे बेळगावात तीव्र आंदोलन
बेळगाव : बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते अन्याय- अत्याचार व हत्याकांडाच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे आज बेळगावात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आणि शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्ता रोको करून बांगलादेश सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून भारताने तात्काळ बांगलादेशावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta