बेळगाव : सीमाभागातील गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी ढोल-ताशा पथकांकडून वाद्यपूजन व सरावाचा शुभारंभ उत्साहात आणि पारंपरिक शिस्तीने केला जातो. याच परंपरेनुसार श्री शिवशंभू ढोल-ताशा पथक, चव्हाट गल्ली, बेळगाव यांच्या वतीने जालगार मारुती मंगल कार्यालय, चव्हाट गल्ली बेळगाव येथे वाद्यपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ढोल, ताशा आणि इतर वाद्यांना दैवी …
Read More »पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील युगपुरुष हरपले
कोल्हापूर : प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. डी. वाय. पाटील यांचे सोमवारी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोल्हापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांचे पूर्ण …
Read More »गॅस ग्राहकांना मोठा इशारा! १४ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी करा; अन्यथा गॅस पुरवठा बंद होण्याची शक्यता
मोबाईलवर कंपन्यांचे संदेश; आधार, बँक पासबुक व गॅस बुकसह तातडीने पडताळणीचे आवाहन बेळगाव : सरकारकडून विविध कल्याणकारी योजनांची फेरपडताळणी सुरू असतानाच आता घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठीही ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या मोबाईलवर संदेश पाठवून १४ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, मुदतीत प्रक्रिया पूर्ण न …
Read More »खचलेल्या सेवा रस्त्याला तळ्याचे स्वरूप
पुणे-बंगळूर महामार्गालगतची स्थिती; नागरिकासह वाहनचालकांची कसरत निपाणी (वार्ता) : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. पण सेवा रस्त्याच्या दर्जाहीन व नियोजनशून्य कामातील त्रुटी आता प्रकर्षाने समोर येऊ लागल्या आहेत. निपाणी परिसरातील अनेक ठिकाणी सेवा मार्ग खचला असून पावसाळ्यात या रस्त्यावर तुडुंब पाणी साचत असल्याने वाहनचालकांसाठी धोका …
Read More »काम सुरू असताना पावसामुळे भिंत कोसळली
तांत्रिक तपासणी पथकाची पाहणी ; परिस्थितीचा अहवाल सादर निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचा कामावेळी खरी कॉर्नर परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामावेळी पोकलँडचा धक्का आणि पावसामुळे भिंत कोसळली. याबाबत घडलेल्या दुर्घटनेबाबत वास्तूस्थिती संबंधितांनी मांडली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने काम करणे अडचणीचे ठरत आहे. …
Read More »बाळूमामा देवस्थान घोटाळा प्रकरणाला वेग; आरोपी फरार, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास तीव्र
कोल्हापूर : आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील कथित 60 कोटी 75 लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तपासाला गती मिळाली आहे. या प्रकरणात तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके, ट्रस्टचे तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात …
Read More »शर्यतीच्या बैलाचा विहिरीत पडून मृत्यू ; बडस ईनाम येथे दुर्दैवी घटना
बडस ईनाम : बडस ईनाम गावात एका दुर्दैवी घटनेत युवा शेतकरी कल्लाप्पा भीमाना पाटील यांचा सुमारे चार लाख रुपये किमतीचा शर्यतीचा बैल विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्लाप्पा पाटील यांच्या घरातून बैल अचानक दोर तोडून बाहेर पडला आणि सैरावैरा पळू लागला. त्याला आवरण्यासाठी …
Read More »तब्बल १९ वर्षांनंतर रंगणार कारलगा श्री महालक्ष्मी महायात्रा!
२४ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान भव्य धार्मिक सोहळा; पूर्वतयारीला वेग, भूमिपूजन संपन्न खानापूर : खानापूर तालुक्यातील कारलगा, कारलगा हट्टी आणि शिवोली या तीन गावांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची बहुप्रतीक्षित महायात्रा तब्बल १९ वर्षांनंतर २४ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२७ या कालावधीत भव्य स्वरूपात पार पडणार आहे. या ऐतिहासिक …
Read More »युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावांतील मराठी प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मराठी शाळा जगल्यावर मराठी भाषा टिकणार आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून मराठी शाळा वाचविण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील …
Read More »लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद नाकारल्याने चन्नम्मा चौकात कार्यकर्त्यांचे आंदोलन
बेळगाव : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारानंतर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा मंत्रिपद देण्याची मागणी करत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी राणी चन्नम्मा चौकात आंदोलन छेडले. मंत्रिमंडळात लक्ष्मी हेब्बाळकर यांना स्थान मिळावे, तसेच बेळगाव जिल्ह्याला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, या मागणीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आले. आंदोलनादरम्यान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta