Monday , September 21 2026
Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा २७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चा २७ वा वर्धापनदिन गुरुवार, दि. ११ रोजी बेळगाव येथील सर्किट हाऊसमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे नेते प्रकाश मोरे होते. यावेळी बोलताना त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, केवळ शरद पवार यांच्या नावावर आमदार आणि खासदार निवडून आणण्याची ताकद असल्याचे सांगितले. देशातील प्रभावी आणि अनुभवी नेतृत्व म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या विचारांवर आणि नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा आजही दृढ विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसेच शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी आगामी काळात अधिक जोमाने संघर्ष करण्याचा निर्धार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला महांतेश कोळूचे, ऍड. रमेश चौगुले, ऍड. वैभव कुद्रे, ऍड. राधेश शहापूरकर, माजी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, राजदील जमादार, संभाजी हिंडलगेकर, सदाशिव कांबळे, भोला पाखरे, निंगाप्पा पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *