निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी. बी. रोडवरील साखरवाडी समाजाच्या नूतन श्री मारुती मंदिरात मुर्ति प्रतिष्ठापना सोहळ्यास बुधवारी प्रारंभ झाला आहे. येथील पुरातन श्री मारुती मंदिराच्या इमारतीचे संगमरवरी दगडात नुतनीकरण करण्यात आले आहे. नव्या मंदिरात श्री मारुती मुर्तिची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. बुधवारी (ता.२५) सायंकाळी ४ वाजता …
Read More »मराठी सन्मान यात्रा २७ फेब्रुवारी ऐवजी होणार १५ मार्च रोजी
मराठी भाषा दिनी राजहंस गडावर होणार शिवरायांना व कुसुमाग्रज होणार अभिवादन बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनाचे औचित्य साधून मराठी सन्मान यात्रेला राजहंसगड येथून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून सुरुवात करण्याचे ठरविण्यात आले होते. त्या प्रमाणे समाज माध्यम व येळ्ळूर, सुळगा, …
Read More »बेळगाव महानगरपालिकेच्या ताफ्यात दोन नवीन शववाहिका दाखल
बेळगाव : बेळगाव शहरातील नागरिकांना अंत्यसंस्काराच्या वेळी सोयीस्कर ठराव्यात, यासाठी महानगरपालिकेने दोन नवीन अत्याधुनिक शववाहिका खरेदी केली असून, आज दोन्ही आमदारांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. शहरातील अंत्ययात्रांसाठी नागरिकांना वेळेवर सुविधा मिळावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या माध्यमातून या शववाहिका घेण्यात आल्या आहेत. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, उत्तरचे …
Read More »लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने भिकाजी कांबळे यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : सुळगाव येथील गायक भिकाजी कांबळे यांनी संविधान प्रास्ताविकेचे अठरा भाषांत गायन केले आहे. त्यांच्या या गायनाची दखल घेऊन लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या उपक्रमाची नोंद झाली आहे. त्यानिमित्त बोरगाव येथील अरिहंत परिवारातर्फे त्यांचा सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बौद्ध उपासक भिकाजी कांबळे यांनी …
Read More »माणकापुर निसर्गराजा ग्रुपतर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांना प्रेरणा पुरस्कारचे वितरण
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील निसर्गराजा ग्रुपतर्फे शिवजयंती व जागतिक महिला दिनानिमित्त सलग २१ व्या वर्षी प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा मलकारसिध्द मंदिरात पार पडला. अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त डीवायएसपी नारायण मोठे-देसाई तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते एन. डी. चौगुले, मदन पलंगे, संभाजी साबळे, अभिनेत्री गीतांजली डोंबे,पूनम चौगुले, ॲड. बाबासाहेब निकम, …
Read More »फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा तीव्र
दुपारीच बाजारपेठा ओस; थंडपेयांना वाढती मागणी निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, रविवारी कमाल तापमानाने ३० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील वर्दळ घटल्याचे चित्र दिसून आले. सकाळी काहीसे आल्हाददायक …
Read More »आसन व्यवस्थेअभावी, महाराष्ट्रातील प्रवासी प्लॅटफॉर्मवर
प्रवाशातून संताप ; निपाणी आगार दुजाभाव करत असल्याचा आरोप निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र आणि कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून निपाणी आगाराची ओळख आहे. पण त्या ठिकाणी कर्नाटकासह महाराष्ट्रातील प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था असल्याने बसची वाट पहात प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहावे लागते. महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना आसन व्यवस्थाच नसल्याने त्यांना …
Read More »शिमोग्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या
क्रिकेट सामन्यातील वादातून घटना, सात अल्पवयीन ताब्यात बंगळूर : शिमोगा येथे सुलेबैलू सरकारी शाळेबाहेर १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. घटनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ऊरगदूर येथील सरकारी माध्यमिक शाळेतील एसएसएलसीचा विद्यार्थी संकेत (वय …
Read More »धारवाडमध्ये सरकारी भरतीसाठी विद्यार्थ्यांचे भव्य आंदोलन; हजारोंचा सहभाग
बंगळूर : राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी धारवाडमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढत आंदोलन केले. श्रीनगर परिसरातून सुरू झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नोकरीसाठी इच्छुक युवक-युवती सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अधिकृत परवानगी नव्हती. तरीही सकाळपासूनच मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार एकत्र …
Read More »स्वावलंबनामुळे उद्योजकतेला चालना मिळेल : डॉ. बी. जी. पाटील
बागेवाडी; महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील परिषद निपाणी (वार्ता) : विकसित भारत हा केवळ आर्थिक वाढीचा घटक नसून तो सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांचा एक व्यापक प्रकार आहे. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. उत्पादन क्षेत्र, शेती, सेवा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विकासासह २०४७ पर्यंत शक्तिशाली देश बनू शकतो. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta