Monday , July 27 2026
Breaking News

Belgaum Varta

कर्नाटकात अभूतपूर्व भ्रष्टाचार; भाजपची टीका

  राज्यात कायदा, सुव्यवस्था ढसळल्याचा आरोप बंगळूर : कर्नाटकमध्ये अभूतपूर्व पातळीवर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपने केला असून, विभागातील प्रत्येक पदासाठी रक्कम निश्चित केली आहे. पक्ष कार्यालयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माजी मंत्री डॉ.सी.एन. अश्वत्थनारायण, विधान परिषद सदस्य चलवादी नारायण स्वामी, माजी आमदार पी. राजीव यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. …

Read More »

महिलेचं डोकं अडकलं चक्क बसच्या खिडकीत!

  बंगळुरू : बसच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचे डोके खिडकीत अडकून बसल्याने गोंधळ उडाल्याचा प्रकार आज बंगळुरूमध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बंगळूरमध्ये राज्य परिवहनच्या बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेने बसच्या लहान खिडकीतून खिडकीबाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या खिडकीतून बाहेर डोकावताना महिलेचं डोकं खिडकीत …

Read More »

अंजली आंबिगेरच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी : कोळी बेस्त समाजाचे आंदोलन

  बेळगाव : हुबळीधील अंजली आंबिगेर नामक तरुणीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज बेळगावमधील जिल्हा कोळी बेस्त समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. बेळगाव जिल्हा कोळी बेस्त समाजाच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून आपला रोष व्यक्त केला. अंजलीच्या मारेकऱ्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली …

Read More »

पाक समर्थक हेरगिरी प्रकरण; एनआयएने फरार मुख्य आरोपीला केली अटक

  बंगळूर : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हैदराबाद हेरगिरी प्रकरणी घोषित गुन्हेगार नूरुद्दीन उर्फ ​​रफी याला अटक केली आहे. नुरुद्दीन जामिनावर बाहेर आला असून तो अनेक दिवस बेपत्ता होता. त्याला म्हैसूरच्या राजीव नगरमध्ये अटक करण्यात आली आहे. नुरुद्दीनवर ५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बुधवारी एनआयए अधिकाऱ्यांनी काही कारणास्तव …

Read More »

सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड; अश्लिल चाळे सुरु असल्याचा आरोप

  सांगली : सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे. कॅफे शॉपमध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफे शॉपची तोडफोड करण्यात आली आहे. सांगली शहरातील विश्रामबाग 100 फुटी रोडवर हे कॅफे शॉप असून आत घुसून तोडफोड करण्यात आली. याशिवाय आणखी …

Read More »

ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी युवराज साळोखे यांची निवड

  निपाणी(वार्ता) : ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी युवराज बाजीराव साळोखे यांची निवड करण्यात आली. याबाबतचे पत्र त्यांना निपाणी येथे देण्यात आले. यावेळी युवराज साळोखे यांनी ४ ह्युमन राईट्स संघटनेच्या माध्यमातून सर्व स्तरावरील सामाजिक कार्य निस्वार्थीपणे संघटनेच्या सर्वांना विश्वासात घेवून केले जाईल असे सांगितले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय …

Read More »

हैदराबाद – गुजरात सामना पावसामुळे रद्द; हैदराबाद प्लेऑफ्समध्ये दाखल तर दिल्ली शर्यतीतून बाहेर

  सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला. सततच्या पावसामुळे मैदान संपूर्ण वेळ कव्हरने झाकले गेले होते. त्यामुळे सामना अधिकाऱ्यांनी सामना रद्द केला. ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफ्समध्ये पोहोचला आहे. हा सामना रद्द झाल्यामुळे हैदराबाद आणि गुजरात या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. हैदराबादचे आता …

Read More »

रणजित कणबरकर यांनी मिळवले टीसीएस वर्ल्ड 10 कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत यश

  बेळगाव : नुकताच जनरल माणिक शॉ परेड ग्राउंड बेंगळुरू येथे झालेल्या टीसीएस वर्ल्ड 10 कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत बेळगाव येथील रणजित शिवाजी कणबरकर यांनी 50 ते 54 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या वर्ल्ड ऍथलेटिक्स मान्यताप्राप्त स्पर्धेत संपूर्ण भारतातून 10,451 धावपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत रणजीत शिवाजी …

Read More »

हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून पडून वॉर्डबॉयचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्याच हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या इसमाचा सफाई काम करताना हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. सुरज देवगेकर असे मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी वॉर्डबॉयचे नाव असून तो विजया हॉस्पिटलचा कर्मचारी होता. वॉर्डबॉयचे काम करणाऱ्या सुरजला सफाईचे काम दिले होते. या कामाचा …

Read More »

टीसीसह पाच जणांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू

  खानापूर : तिकीट तपासण्यासाठी आलेल्या टीसीवर प्रवाशाने प्राणघातक हल्ला केला असता टीसीला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर चार जणांवर प्राणघातक हल्ला झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर बेळगाव येथे जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चालुक्य एक्सप्रेस (पॉंडेचेरी-दादर) रेल्वेमध्ये टीसी प्रवाश्यांचे तिकीट …

Read More »