Sunday , September 20 2026
Breaking News

युवा समिती बेळगावच्या वतीने मध्यवर्तीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. प्रकाशदादा मरगाळे यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. प्रकाशदादा मरगाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शिवाजी हंगिरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, उमेश पाटील, बाबू कोले, विशाल गौंडाडकर, शेखर तळवार, साईनाथ शिरोडकर, विनोद आंबेवाडकर, सतीश देसाई सर आदी उपस्थित होते.
सात दशके प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सर्वांनी मिळून जोमाने प्रयत्न करून अखेरचा भीमटोला देऊया असे यावेळी मध्यवर्ती अध्यक्ष म्हणाले. तसेच बेळगाव पत्रकार संघटनेच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे त्याला मराठी भाषिकांनी प्रतिसाद देत ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *