Sunday , September 20 2026
Breaking News

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने AI चा शिक्षणातील वापर व परिणाम व्याख्यानाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी तर्फे मराठी माध्यम माझी यशोगाथा या व्याख्यान सत्राच्या अंतर्गत व्हिटीयुचे प्राध्यापक प्रशांत ढोपे यांचे AI चा शिक्षणातील वापर व परिणाम, भविष्यातील संधी या विषयावरील व्याख्यान बेळगाव परिसरातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता मराठी विद्यानिकेतन च्या सभागृहामध्ये हे व्याख्यान होणार आहे. प्राध्यापक प्रशांत ढोपे हे आंबेवाडी येथील रहिवासी असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. जी.एस.एस कॉलेजमधून ते पीयुसी उत्तीर्ण झाले व के एल ई येथील इंजीनियरिंग कॉलेजमधून त्यांनी बीई ही पदवी सुवर्णपदकासह पटकाविली. यानंतर एम टेक ही पदवी त्यांनी व्हिटीयू येथून पूर्ण केली आहे.व सध्या ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयावर पीएचडी संशोधन करत आहेत. सध्या व्हिटियू मध्येच ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते विविध विषयांवरच्या कार्यशाळा घेतात व विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स बद्दल मार्गदर्शन करतात. सध्याचे युग हे AI क्रांतीचे युग म्हणून ओळखले जात आहे. AI मुळे जगभरात सर्वच क्षेत्रांमध्ये मोठे बदल होत आहेत. शिक्षण क्षेत्रावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. AI चा वापर करून अध्यापन कौशल्य अधिक सोपे कसे करता येईल त्याचबरोबर AI च्या वापरातील मर्यादा व धोके कोणते आहेत, याबाबत शिक्षकांना ते मार्गदर्शन करणार आहेत. तरी या व्याख्यानाचा लाभ बेळगाव परिसरातील शिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *