Sunday , September 20 2026
Breaking News

मोफत रंगभूषा उपक्रमातून शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प

Spread the love

 

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याच परंपरेला पुढे नेत, साल 2026 च्या शिवजयंती उत्सवानिमित्त सकल मराठा समाज व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मोफत रंगभूषा (मेकअप) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वडगाव, शहापूर आणि बेळगाव परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या विविध ऐतिहासिक पात्रांना साकार करणाऱ्या कलाकारांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून कलाकारांना मोफत रंगभूषा करून देत शिवभक्तीची सेवा करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या उपक्रमासाठी मेकअप आर्टिस्टचीही आवश्यकता असून, समाजातील इच्छुक व अनुभवी कलाकारांनी सेवाभावाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी कलाकारांना मानधन स्वरूपात सेवा शुल्कही देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या उपक्रमासाठी सहकार्य करू इच्छिणाऱ्यांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे –
संजय सातेरी (9880042636), सागर पाटील (9964777565), विराज मुरकुंबी (9945864341), उदय पाटील (7090189695), मनोहर हलगेकर (9972468078), दुर्गाप्रसाद जोशी (9343883772) आणि महादेव पाटील (9481535528).

शिवजयंतीच्या निमित्ताने समाजातील एकजूट आणि सेवाभाव वाढविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *