
बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक पारंपरिक शिवजयंतीचे हे १०७ वे वर्ष असून आज पारंपारिक शिवजयंती उत्सवाला दिमाखात सुरुवात झाली. सकाळी सात वाजल्यापासून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे विविध गडकिल्ल्यावरून येणाऱ्या शिवजयंती उत्सव मंडळाच्या शिवज्योतींचे स्वागत अध्यक्ष अंकुश केसरकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष तथा मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे, कार्यवाह मदन बामणे, उपाध्यक्ष गणेश दड्डीकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, शहापूर महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, राजू मोरे, बाबू कोले, अनिल अमरोळे, विकास कलघटगी, राजू मरवे, उमेश पाटील, मोतेश बारदेसकर आदींनी केले.
त्यानंतर नरगुंदकर भावे चौक येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या मंडपामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उद्योजक शिरीष गोगटे यांनी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाला गणेश मूर्ती भेट दिली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, विविध मान्यवर, शिवभक्त उपस्थित होते. यानंतर छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथील शिवरायांच्या मूर्तीला अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आरती आणि अभिवादन केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी श्री. प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर, रणजीत चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुसकर, ऍड. अमर येळूरकर, नेताजी जाधव, किरण जाधव, गणेश दड्डीकर, रमेश पावले, बाळाराम पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणु किल्लेकर, शिवानी पाटील, विकास कलघटगी, राजू मोरे, गजानन पाटील, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, राजू बिरजे, प्रशांत भातकांडे, अमित देसाई, उमेश पाटील, अशोक चिंडक, पी. जी. घाडी, बाबू कोले, अनिल अमरोळे, सुनील मुरकुटे, सतीश देसाई, विनोद आंबेवाडीकर, किरण हुद्दार, सुरज कुडूचकर, सचिन केळवेकर, प्रतीक पाटील, श्रीकांत कदम, हिरालाल चव्हाण, श्रीकांत प्रभू, साईराज जाधव, साईनाथ शिरोडकर, वासू सामजी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta