Monday , September 21 2026
Breaking News

युवा सेना बेळगावतर्फे चित्ररथ मिरवणुकीदरम्यान शीतपेय वाटपाचा स्तुत्य उपक्रम

Spread the love

 

बेळगाव : श्री शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा सेना बेळगावतर्फे चित्ररथ मिरवणुकीदरम्यान शीतपेय वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. ताकाच्या स्वरूपात करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे हजारी शिवभक्तांना दिलासा मिळाला.

बेळगावची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक सलग अनेक तास चालत असल्याने मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शिवभक्तांसह विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांना उष्णतेचा त्रास होतो. याच पार्श्वभूमीवर त्यांना ताजेतवाने ठेवण्यासाठी युवा सेना बेळगाव गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शीतपेय वाटपाचा उपक्रम राबवत आहे. त्यानुसार यावर्षी शहरातील गर्दीचे केंद्र असलेल्या हुतात्मा चौक येथे विशेष काउंटर उभारून ताक आणि पुलावाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे 3000 शिवभक्तांनी लाभ घेतला, थंडगार ताकाचा आस्वाद घेताना अनेकांनी या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवा सेना बेळगावचे विनायक हुलजी, मल्हारी पावणे, वैभव कामत, श्वेत तवनशेट्टी, संदेश तवनशेट्टी, विजय मोहिते, अद्वैत चव्हाण-पाटील, ओमकार बैलूरकर, श्रेय निठारी, सक्षम कंग्राळकर, निलेश पाटील, अथर्व जाधव, विहोश बडसकर, सुरज तेली, प्रज्वल मुद्दापुरे, स्वयं कपिलेश्वरी, आदित्य गावडे, साई नायडू आदींनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *