Monday , June 8 2026
Breaking News

शिवजयंती मिरवणुकीत शिवभक्तांसाठी पाण्याचे वाटप; गोगटे मिलकडून स्तुत्य उपक्रम

Spread the love

 

बेळगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मिरवणुकीच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असताना, हजारो शिवभक्तांसाठी एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना दिलासा मिळावा यासाठी गोगटे मिलचे प्रमुख श्री. गोगटे सर यांनी मोठ्या उदार मनाने हजारो पाण्याच्या बाटल्यांचे प्रायोजन करून त्याचे वितरण केले.

या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडयेकर, पद्मप्रसाद हुली, शशिकांत अंबेवाडकर, विक्री मेहता आणि शंकर लामाणी यांनी अत्यंत समर्पित भावनेने पार पाडले. मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी पाणी वितरण करून त्यांनी शिवभक्तांची तहान भागवली आणि सेवा भावाचे उत्कृष्ट उदाहरण चालून दिले.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले असून, शिवभक्तांनीही या सेवाभावी कार्याचे मनापासून स्वागत केले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे सण-उत्सव अधिक अर्थपूर्ण ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

भाऊबंदकीच्या जमीन वादातील मारहाण प्रकरणात पाच जणांची निर्दोष मुक्तता

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील चव्हाट गल्ली परिसरात भाऊबंदकीच्या जमीन वाटपाच्या वादातून झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *