Wednesday , June 17 2026
Breaking News

विजयदुर्ग खाडीतील जलतरण स्पर्धेत हर्षवर्धनला सुवर्ण तर स्मरण, गाथा, गनीष्का यांना रौप्य पदके

Spread the love

 

बेळगाव : जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने संपन्न झालेल्या सिंधुदुर्ग खाडीतील जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूनी घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये कुमार हर्षवर्धन कर्लेकर यांने एक किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला तर कुमारी गाथा दड्डीकर पाचशे मीटर, कुमारी गणीष्का यलजी एक किलोमीटर व स्मरण मंगळूरकर पाच किलोमीटर यांनी द्वितीय क्रमांकासह रौप्य पदके संपादन केली. त्याचबरोबर कुमारी सोयरा मन्नोळकर एक किलोमीटर स्पर्धेत तृतीय क्रमांक, कुमारी प्रणम्या प्रभू पाचवा क्रमांक, कुमार रंजन कुलकर्णी दोन किलोमीटर चौथा क्रमांक, कुमार प्रसाद सायनेकर तीन किलोमीटर सहावा क्रमांक कुमार मयुरेश जाधव तीन किलोमीटर नववा क्रमांक, कुमारी प्राजक्ता प्रभू तीन किलोमीटर स्पर्धेत 4 था क्रमांक पटकाविला.
वरील सर्व जलतरणपटू हे आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे सदस्य असून त्यांना एन आय एस प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, शिवराज मोहिते, विजय नाईक, सतीश धनुचे यांचे मार्गदर्शन तसेच क्लबचे अध्यक्ष शितल हुलभते, श्री अरविंद संगोळी, सौ. शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभते.

About Belgaum Varta

Check Also

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भाजप महिला मोर्चातर्फे विविध सेवा उपक्रम; योग दिनही साजरा

Spread the love    बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *