Wednesday , August 26 2026
Breaking News

जितो बेळगाव वतीने दोन दिवसीय हर्षोत्सव कार्यक्रमाचे आयोजन : हर्षवर्धन इंचळ

Spread the love

 

बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, जितो बेळगाव संस्थेच्या वतीने आणि जितो केकेजी झोनच्या सहकार्याने बेळगाव 9 आणि 10 मे रोजी जितो हर्षोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती, जितोचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचळ यांनी आज मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना संस्थेचे व्हाईस चेअरमन आणि इव्हेंट कन्व्हेनर विक्रम जैन म्हणाले, जितो संस्थेच्या वतीने संपूर्ण वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आरोग्य विषयक उपक्रम राबविले जात असतात‌‌. जितो हर्षोत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा वर्ग आणि संपूर्ण कुटुंबाला सामावून घेणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.शनिवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय व्यवसाय विकास परिषदेचे अध्यक्ष सुनील शिंगे कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता शानदार शांतीभाई यांचे व्याख्यान होईल. दुपारी तीन वाजता विवेक सिंगी यांच्या जादूच्या प्रयोगांचा कार्यक्रम संपन्न होईल. सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध गायक विवेक पारेख आणि सहकाऱ्यांचा भक्ती एक संगीताचा कार्यक्रम संपन्न होईल.

रविवार दिनांक 10 मे रोजी सकाळी 10 वाजता प्रसिद्ध आध्यात्मिक वक्ते ऋषी नंदा यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर कृष्णा राठी यांचे वैयक्तिक आणि औद्योगिक विकास या विषयावर आपले विचार मांडतील.दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी निवृत्त आयएफएस अधिकारी, भारतीय राजकीय विश्लेषक आणि केंद्र सरकारचे सल्लागार डॉ. दीपक वरा यांचे प्रगतशील भारत या विषयावर आपले विचार मांडतील. दुपारच्या सत्रात राहुल कपूर ‘जीवनात सर्व काही शक्य आहे’ या विषयावर आपले विचार मांडतील त्यानंतर यशस्वी युवा उद्योजकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम संपन्न होईल.

सदर कार्यक्रम सर्वांना मोफत खुला असला तरीही यासाठी सर्वांना नोंदणी करून पास घेणे आवश्यक आहे. विनामूल्य पासेस साठी जितो बेळगावच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.पास असलेल्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल याची सर्वांनी विशेष नोंद घ्यावी असेही विक्रम जैन यांनी यावेळी स्पष्ट केले. संस्थेचे चीफ सेक्रेटरी अभय आदीमनी यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

BEACON जिल्हा सदस्यत्व सेमिनार बेळगाव येथे यशस्वीपणे संपन्न

Spread the love  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे “BEACON – जिल्हा सदस्यत्व सेमिनार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *