Wednesday , August 26 2026
Breaking News

हंगरगा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; संपूर्ण संसार भस्म

Spread the love

 

बेळगाव : हंगरगा (ता. जि. बेळगाव) गावातील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत गृहपयोगी साहित्यसह संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

आगीच्या भक्षस्थानी पडलेले घर राजू भरमा पाटील यांच्या मालकीचे असून घडलेल्या दुर्घटनेमुळे त्यांची आयुष्यभराची कमाई जळून खाक झाली आहे. आगीत पाटील यांनी विशेषतः आपल्या मुलीच्या लग्नासाठी मोठ्या आशेने साठवून ठेवलेले सर्व साहित्य जळून नष्ट झाले असून, संबंधित कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. आगीच्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संकटात सापडलेल्या पाटील कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी लक्ष्मीताई फाउंडेशन पुढे सरसावले आहे. घटनेची माहिती मिळताच फाउंडेशनच्यावतीने कार्यालयीन सहकारी व स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत पीडित राजू पाटील यांना तातडीने आर्थिक मदत पोहोचवण्याव्दारे “अडचणीच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हेच खरे मानवतेचे लक्षण आहे,” असा संदेश देण्यात आला. दरम्यान, राजू पाटील यांच्या कुटुंबाला ओढवलेल्या कठीण प्रसंगाचा सामना करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना गावकऱ्यांकडून केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव केन्द्राला राष्ट्रीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक

Spread the love  बेळगाव (प्रतिनिधी) : बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली मध्यवर्ती संघटना व मराठी प्रतिष्ठान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *