Wednesday , August 26 2026
Breaking News

किरण जाधव यांनी घेतली श्रीलक्ष्मी देवीचे दर्शन; लोककल्याणार्थ प्रार्थना करून रयतेच्या हितासाठी घातले देवीकडे साकडे

Spread the love

 

बेळगाव : सकल मराठा समाजाचे नेते आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांनी आज कंग्राळी बुद्रुक येथे जाऊन श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले श्री लक्ष्मी देवी समोर नारळ ओटी ठेवून देवीचा शुभ आशीर्वाद घेतला. लोककल्याणार्थ प्रार्थना करून सर्व समाजाला सुखी, समाधानी आणि आनंदी ठेव. समाजातील दुष्ट शक्तींचा न्हायनाट कर, शेतकऱ्यांचं भलं कर, अशी मागणी यावेळी किरण जाधव यांनी देवीकडे केली.
यावेळी श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष जयराम पाटील, अर्जुन पावशे, बाळू पाटील, रोहन पाटील, विजय पावशे यांनी किरण जाधव यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.
याप्रसंगी सकल मराठा समाज कार्यकर्ते आणि किरण जाधव मित्रपरिवार उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव केन्द्राला राष्ट्रीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक

Spread the love  बेळगाव (प्रतिनिधी) : बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली मध्यवर्ती संघटना व मराठी प्रतिष्ठान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *