Sunday , June 28 2026
Breaking News

महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेत अध्यक्ष किशोर बाली यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांनी नुकताच सहकार क्षेत्रातील माहिती घेण्यासाठी एक महिन्याचा अमेरिका या राष्ट्राचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून ते निपाणीत परतले आहेत. त्यानिमित्त संस्थेतर्फे त्यांचा संस्थेचे संस्थापक सहकाररत्न संस्थापक डॉ. सी. बी. कुरबेट्टी चिकोडी सौहार्द फेडरेशन डेव्हलपमेंट अधिकारी जवाहर रवींद्र मुगन्नावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष बाली यांनी, सहकार क्षेत्रात अनेक योजना असून त्यांचा अभ्यास तेवढा पूर्ण केला आहे. या पुढील काळात सभासद कर्जदार आणि ठेवीदारांसाठी विविध योजना राबविणे शक्य होणार असल्याचे सांगितले.

यावेळी संचालक प्रताप पट्टनशेट्टी, डॉ. एस.आर. पाटील, श्रीकांत परमने, सुरेश शेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी विजयाशेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस. के अदन्नावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, भद्रेस फुटाणे, विद्या कमते, महादेव बडगीर, सुरज घोडके चंद्रकांत हंबर व कर्मचारी उपस्थित होते. सुजाता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप गायकवाड यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘अग्नि सुरक्षा’ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Spread the love    निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *