Friday , August 28 2026
Breaking News

कोणतेही राजकारण न आणता कपिलतीर्थ तलावाचा विकास साधणार : आमदार राजू सेठ

Spread the love

 

बेळगाव : कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागील कपिलतीर्थ मंदिर तलावात रविवारी दिनांक 3 मे रोजी झालेल्या दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू ही दुःखदायक घटना आपल्या परिसरात होणे ही बाब आपल्यासाठी वेदनादायी गोष्ट आहे, ज्या दिवशी घटना घडली मी स्वतः जातिनिशी या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून तिथे उपस्थित राहून प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा कार्यास लावली. त्यानंतर 4 मे रोजी आजू बाजूच्या घरांनाही त्याचा धोका निर्माण होऊन तडे गेले व माती ढासळू लागली.

त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा श्रेयवाद व राजकारण न आणता कपिलेतीर्थ तलावाचा विकास करून ही जागा सुशोभित,विकसित व सुरक्षित करणे हे आपले कर्तव्य समजून माझ्या फंडातून साडेतीन कोटींचा निधी मी उपलब्ध करून देत आहे, यासाठी गोडसे कुटुंबियांचे म्हणणे मी ऐकून घेतले आहे तश्या सूचना मी पालिका प्रशासनाला दिलेल्या आहेत, या सर्व परिसराचा विकास करण्याचा आपला मानस असून शेकडो वर्षे जुनी असलेली ऐतिहासिक कपिलेश्वर व्यायाम शाळा जिथे अनेक नामवंत शरीर शौष्ठवपट्टू उदयास आले तसेच तेथील समुदाय भवन विकसित करणेचे आहे, जेणेकरून इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला सुरक्षित वाटले पाहिजे व मन प्रसन्न झाले पाहिजे, त्या परीने सर्वोतोपरी प्रयत्न मी करणार आहे, तसेच लवकरच जिल्हा प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यां समवेत जागेचा पाहणी दौरा करून ठोस कार्यास सुरुवात करणार आहोत. असे आश्वासन बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले, आपली बाजू मांडण्यासाठी व सविस्तर माहिती सांगण्यासाठी गोडसे कुटुंबियांच्या वतीने श्रीकांत गोडसे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कै. बहिर्जी शिरोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *