Monday , August 17 2026
Breaking News

विविधोद्देशीय ग्रामीण कृषी संघातर्फे मृतांच्या वारसांना मदतीचे धनादेश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाच्या सभागृहात संघाचे दिवंगत सभासद शिवलिंग ऐदमाळे आणि महादेव मडिवाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांना एस.ए.एस. विमा कंपनीतर्फे प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर झाले होते. त्या विमा धनादेशांचे वितरण कुटुंबीयांना शुक्रवारी (ता.२६) करण्यात आले. संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. मृतांचे वारसदार सुभाष ऐदमाळे आणि अनिल मडिवाळ यांना हे धनादेश देण्यात आले.
उत्तम पाटील यांनी, ग्रामीण भागातील शेतकरी व सभासदांच्या कुटुंबांना संकटकाळी आर्थिक आधार मिळावा, या हेतूने संघातर्फे विमा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सहकार संस्थांमुळे सभासदांच्या जीवनात सुरक्षितता व विश्वास निर्माण झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमास संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, संचालक राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील, सुनिता बंकापुरे, राजू गजरे, प्रदीप माळी, राजेंद्र ऐदमाळे, प्राजक्ता पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब चौगुले, राकेश फिरगन्नावर यांच्यासह संचालक, सभासद, पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *