Friday , June 26 2026
Breaking News

काशी जगदगुरु स्वामींच्या मिरवणूकीला अलोट गर्दी

Spread the love

 

मान्यवरांसह स्वामींची उपस्थिती; दोन दिवस विविध कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील विरशैव लिंगायत समाज, पोट जाती व जंगम समाज यांच्यावतीने काशी जगदगुरुंचा उत्सव सोहळ्यानिमित्त वाद्यांच्या गजरात काढलेली मिरवणूक तब्बल दोन तास सुरू होती. त्यामध्ये मान्यवरासह समाजबांधव सहभागी झाले होते.
दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजता काशी जगदगुरुकडुन ईस्टलिंग पूजा व लिंग दीक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी जत्राट वेस येथील बसव सर्कल येथून रथातून स्वामींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रारंभी आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते स्वामीं सत्कार करण्यात आला. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीसमोर पालखी कलश घेतलेल्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अखंड जयघोषात ही मिरवणूक महादेव मंदिर, गांधी चौक, कोठीवाले कॉर्नर, दलाल पेठ या मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आली होत्या. शिवाय ठीकठिकाणी महिलांनी कलशाद्वारे पाणी घालून स्वामीजी दर्शन घेतले.
यावेळी गौरीशंकर मठ कब्बुर येथील रेवणसिद्ध शिवाचार्य स्वामी हिरेमठ पाच्छापूर येथील विश्वाराध्य शिवाचार्य स्वामी, हिरेमठ अंबिकानगर उत्तर कन्नड येथील गुरुईश्वर पंडिताध्याय स्वामी, आडी अप्पणावर कुमारेश्वर विरक्तमठ खडकलाट येथील शिवबसव स्वामी, मुर्गेन्द्र विरक्तमठ निपाणी येथील बसव मलिकार्जुन स्वामी उपस्थिती होती.
यावेळी हालशुगरच्या उपाध्यक्षा गीता पाटील, केएलई संस्थेचे संचालक अमर बागेवाडी, डॉ.सी.बी.कुरबेट्टी, चंद्रकांत कोठीवाले, सुनील पाटील, पप्पू पाटील, संजय मोळवाडे, रवींद्र शेट्टी, बी. जी.‌ हिरेमठ, शिवानंद पुराणिकमठ, वज्रकांत सदलगे, ॲड.महेश दिवाण, शेखर नणदीमठ, राजू गुंदेशा यांच्यासह वीरशैव लिंगायत समाज पोटजाती व जंगम समाजाचे पदाधिकारी, नागरिक, महिला, उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

बेंदूर सणानिमित्त बोरगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जनावरांचे प्रदर्शन

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक बेंदूर सणानिमित्त बोरगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सुनील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *