Monday , August 17 2026
Breaking News

आनंदवाडी येथील श्री भाग्यलक्ष्मी कॉ-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड चेअरमनपदी सूर्यकांत शिवणगेकर

Spread the love

 

बेळगाव : आनंदवाडी शहापूर येथील श्री भाग्यलक्ष्मी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक माजी नगरसेवक व मावळते चेअरमन श्री. मनोहर हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी सूर्यकांत शिवणगेकर यांची चेअरमन पदी व श्रीमती लीला मुचंडी यांची व्हाईस चेअरमन पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी माजी महापौर संचालक किरण सायनाक, माजी नगरसेवक संचालक मनोहर हलगेकर, मोहन मेलगे, नागेश जाधव, कुलदीप भेकणे, विकास भातकांडे, संचालिका लक्ष्मी अकनोजी, सेक्रेटरी श्रीपाद पाटील, सभासद तसेच सर्व कर्मचारी व पिग्मी कलेक्टर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व विश्वभारत सेवा समितीचे दुसरे बालकवी संमेलन 18 ऑगस्टला

Spread the love  बेळगांव : तारांगण व विश्वभारत सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने दुसरे बालकवी संमेलन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *