


नवी दिल्ली : आयोध्येतील राम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांमध्ये चोरी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी 8 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने एसआयटी दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारकडे प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. रामाशंकर उर्फ टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, कमलेश पांडे, मनीष यादव, लवकुश मिश्रा, रामा शंकर मिश्रा आणि सुभाष श्रीवास्तव अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केले आहे.
राम मंदिर उभारणीच्या आधीपासून तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात देणग्या देण्यात आल्या. मात्र या देणग्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप अनेक दिवसांपासून केला होता. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी दबाव वाढत असतानाच विश्व हिंदू परिषदेनेही चौकशीची मागणी लावून धरली होती. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गंभीर दखल घेत मंदिर न्यासाकडून तक्रार आल्यानंतर 13 जून रोजी तीन जणांची एसआयटी स्थापन केली. त्यामध्ये लखनऊचे विभागीय पोलिस आयुक्त विजय पंत, पोलिस महानिरीक्षक किरण एस. आणि वित्त विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे.
मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल! बड्या मंत्र्यांना डच्चू; ठाकरेसेना फोडणाऱ्या शिंदेंसेनेला बक्षीस, श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद?
दोन दिवसांपूर्वी एसआयटीने प्राथमिक अहवाल सरकारकडे सादर केला. त्यानंतर गुरुवारी श्रीराम जनभूमी तीर्थक्षेत्राचे न्यासाचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या प्रकरणी जो दोषी आढळेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुन्हा दाखल झालेले 8 आरोपी
रामाशंकर उर्फ टिनू यादव, सुभाष श्रीवास्तव, रामशंकर मिश्रा, करुणेश पांडे, मनीषकुमार यादव, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला अशी गुन्हे दाखल झालेली आरोपीची नावे आहेत. त्यामध्ये टिनू यादव हा राम मंदिर न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचा माजी चालक आहे. लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा यांच्याकडे देणग्यांच्या रकमेची मोजणी करण्याचे काम होते. तर चांदी चोरी प्रकरणी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी राजीनामा दिला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta