Friday , June 26 2026
Breaking News

‘अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’कडून दुचाकी वाहनांची तपासणी : तलवार आणि चाकूसह दोघांना अटक

Spread the love

 

बेळगाव : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांच्या ‘अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’कडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या पथकाकडून दुचाकी वाहनांची तपासणी केली जात आहे.
या कारवाईदरम्यान या पथकाने बेकायदेशीररीत्या तलवार आणि चाकू बाळगणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
शहरभर सुरू असलेल्या या धडक मोहिमेत संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. वाहनांच्या डिक्कीमध्ये चाकू, जांबिया आदी धारधार शस्त्रे दडविण्यात आली आहेत का याचा तपास अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’कडून केला जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
संशयास्पद हालचाली किंवा व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तातडीने 112 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आर. सर्विसेस डेव्हलपर्स बेळगावच्या संचालिका डॉ. सौ. राजश्री राजू तुडयेकर यांच्याकडून सावगाव शाळेला संगणक भेट

Spread the love  बेळगाव : आर. सर्व्हिसेस डेव्हलपर्स बेळगावच्या संचालिका डॉ. राजश्री राजू तुडयेकर यांच्याकडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *