Monday , August 17 2026
Breaking News

पाही व्हाइब्स फाउंडेशन, शक्ती सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप; वाचन संस्कृतीला चालना

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने पाही व्हाइब्स फाउंडेशन आणि शक्ती सामर्थ्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. २५) सदाशिवनगर येथील शासकीय शाळा क्रमांक २२ मध्ये पुस्तक वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासह त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

या पुस्तक वाटप उपक्रमासाठी नवज्योत टेक्नॉलॉजीज प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक अमित नाईक यांनी प्रायोजकत्व स्वीकारून मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पुस्तके पोहोचविणे शक्य झाले.

कार्यक्रमात पाही व्हाइब्स फाउंडेशन आणि शक्ती सामर्थ्य फाउंडेशनचे सर्व सदस्य उत्साहाने सहभागी झाले. यामध्ये ऍड. भुविका, डॉ. शिर्देवी, विजय, शिवानंद, श्वेता आणि लक्ष्मण यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी पाही व्हाइब्स फाउंडेशनच्या संस्थापक-संचालिका रक्षा यू. आणि शक्ती सामर्थ्य फाउंडेशनच्या संस्थापक-संचालिका लता अनास्कर यांनी सांगितले की, “पुस्तक म्हणजे केवळ कागद आणि शाई नसून ते विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी गुरुकिल्ली आहे. या उपक्रमासाठी सहकार्य करणारे प्रायोजक आणि सर्व स्वयंसेवकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”

शिक्षण आणि समाजकल्याणासाठी भविष्यातही अशा विविध उपक्रमांचे आयोजन करून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्धार दोन्ही संस्थांनी यावेळी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *