Friday , August 28 2026
Breaking News

झोपण्याच्या जागेवरून वाद : कित्तूर देवगाव येथे एकाची निर्घृण हत्या

Spread the love

 

आरोपीला काही तासांत अटक
बेळगाव : कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगाव येथे घरासमोर झोपण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाले.
बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी कित्तूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला काही तासांत अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के.रामराजन यांनी दिली.

बेळगावात येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महांतेश निंगाप्पा हुच्चन्नावर (वय ५२) हे आरोपी प्रकाश कल्लप्पा कलार यांच्या घरासमोर झोपले होते. “माझ्या घरासमोर का झोपला?” या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.

वाद वाढल्यानंतर आरोपी प्रकाश कलार याने महांतेश यांना खाली पाडून दगडाने त्यांच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्यावर ओढत नेल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या घटनेनंतर मृताचे नातेवाईक राजू पुंडलिक हुच्चन्नावर यांनी कित्तूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपी प्रकाश कलार याला अटक केली.

या कारवाईत बैलहोंगलचे डीएसपी डॉ. वीरय्या हिरेमठ, सीपीआय शिवानंद गुडेगनट्टी, पीएसआय प्रवीण गंगोळ आणि कित्तूर पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी यांनी पथकाच्या जलद कारवाईचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कै. बहिर्जी शिरोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *