Friday , August 28 2026
Breaking News

बेळगावातील नाले सफाईसाठी १ कोटी ५ लाखांची तरतूद; दोन ठेकेदार ही नियुक्त

Spread the love

 

बेळगाव – बेळगाव शहरात दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणी तुंबण्याच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने नाले सफाईच्या कामाला गती दिली आहे. तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांच्या खर्चातून हाती घेण्यात येणाऱ्या या कामासाठी दोन ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात त्यांना कार्यादेश देण्यात येणार आहेत.

कार्यादेश मिळाल्या नंतर शहरातील नाल्यांची प्रत्यक्ष सफाई तातडीने सुरू होणार आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्वनाल्यांची प्राथमिक सफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतरही आवश्यकतेनुसार संबंधित ठेकेदाराकडून सफाईचे काम सुरूच ठेवले जाणार आहे. अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ एकदाच नव्हे तर परिस्थितीनुसार पुढील हस्तक्षेप शक्य होणार आहे.

महापालिकेच्या बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत यापूर्वी नालेसफाईचा मुद्दा चर्चेस आला होता. अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी त्यावेळी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली होती. मात्र प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी लागला. नियमानुसार निविदा प्रक्रिया राबूनच ठेकेदार नियुक्त करणे आवश्यक असल्याने विलंब झाला असल्यास ते स्पष्ट करण्यात आले. कार्यादेश मिळतात कोनवाळ गल्ली, लेंडी नाला यासारख्या शहरातील प्रमुख नाल्यांपासून सफाईला सुरुवात होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

कै. बहिर्जी शिरोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *