Friday , August 28 2026
Breaking News

बंगळुरु ते मुंबई सुपरफास्ट ट्रेन धावणार

Spread the love

 

नवी दिल्ली : भारतात रेल्वेचे जाळे खूप वेगाने पसरत आहे. यामध्ये आता आणखी अनेक ट्रेनचा समावेश करण्यात येणार आहे. लवकरच बंगळुरु मुंबई सुपरफास्ट ट्रेन लाँच होणार आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, बहुप्रतिक्षित बंगळुरु- मुंबई सुपरफास्ट ट्रेन जून अखेरपर्यंत सुरु केली जाईल.

मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, ही ट्रेन मध्य कर्नाटकमधून जाणार आहे. पुढे तुमकुरु, दावणगेरे, हावेरी, हुबळी-धारवाड आणि बेळगाव मार्गाने मुंबईला जाणार आहे. याचसोबत येत्या काही दिवसात सुपरफास्ट ट्रेनचे वंदे भारत स्लीपरमध्ये रुपांतर करण्यासही सहमती दर्शवली आहे. प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, आधुनिक प्रवासी सुविधा पुरवण्यासोबत हुबळी रेल्वे पुनर्विकासावरही चर्चा करण्यात आली. पुढे लोकापूर-सावदत्ती आणि धारवाड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाची मागणी केली आहे. याला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे. या घोषणेमुळे बंगळुरु आणि मुंबई दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसेच कर्नाटकातील हुबळी-धारवाड प्रदेशातील पायाभूत सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे, असं प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे.

बंगळुरु ते मुंबई कनेक्टिव्हिटी वाढणार

बंगळुरु ते मुंबई सुफरफास्ट ट्रेनमुळे दोन राज्ये जोडली जाणार आहेत. यामुळे कर्नाटक, बेळगाव या सीमालगतच्या भागांना खूप फायदा होणार आहे. या ट्रेन जून अखेरपर्यंत सुरु होणार आहे. यामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. यामुळे प्रवास खूप सुपरफास्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

कै. बहिर्जी शिरोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *