Friday , August 28 2026
Breaking News

बोअरवेल बसवण्याच्या मुद्द्यावरून शेतकरी वडील आणि मुलावर अज्ञातांनाकडून तलवारीने हल्ला!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील धामणे स. गावात बोअरवेल बसवताना दुसऱ्याच्या जमिनीमध्ये वाहन पार्क केल्याबद्दल अज्ञातांनी शेतकऱ्यावर आणि त्याच्या मुलावर तलवार आणि भाल्याने हल्ला केला.

जीवप्पा गावडे नावाच्या शेतकऱ्यावर तलवार आणि भाल्याने हल्ला करण्यात आला. ज्या अज्ञातांनी आम्हाला आमच्या जमिनीवर बोअरवेल बसवू दिली नाही, ते आमची जमीन बळकावण्याचा कट रचत होते. त्यांनी आमचा छळ करून आमची जमीन बळकावण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. पण आज सकाळी ते अचानक आले आणि त्यांनी आमच्यावर तलवार आणि भाला घेऊन हल्ला केला. जीवप्पा गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ग्रामीण पोलीस ठाण्यात संरक्षणासाठी केलेल्या आमच्या विनंतीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा आरोप देेेखील मुलगा अनिल गावडे यांनी केला. ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावचे सीईओ राहुल शिंदे यांच्यावर सरकारकडून महत्त्वाची जबाबदारी

Spread the love  बेळगाव : जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांच्यावर ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *