Friday , August 28 2026
Breaking News

निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यक्षेत्रातील सहशिक्षक ते मुख्याध्यापकांना बढती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : चिक्कोडी येथील उपनिर्देशक सीतारामू यांच्या मार्गदर्शनाखाली व क्षेत्र शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांच्या उपस्थितीत सहशिक्षक ते मुख्याध्यापक पदी बढती प्रक्रिया पार पडली. निपाणी तालुक्यात मराठी कन्नड व उर्दू या तिन्ही माध्यमा मध्ये एकूण ३८ शिक्षकांनी मुख्याध्यापक पदी बढती घेतली. कर्नाटक राज्य प्राथ शिक्षक संघातर्फे या कार्यक्रमाचे नियोजन करून बढती प्राप्त शिक्षकांना एकाचवेळी एकाच दिवशी आदेश देण्यात आला. त्यानंतर संघातर्फे सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक शिक्षक संघाचे अध्यक्ष एन. जी. अत्तार, संजीव खामकर, ज्योतीबा चिंदके, जे. एस. माळी, दादासाहेब नाईक, एस. आय. अत्तार, अजीतकुमार गोरवाडे, धारव सर, पी टी कांबळे, स्मिता कुरणे, सुनिता प्रताप, ललिता प्रताप यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, ‘सुकाणू कमीटीचे सदस्य प्राथ शिक्षक संघाचे नवनिर्वाचीत पदाधिकारी, सदस्य, ऑफिस सुपरिडेंट शिंदे सर सहाय्यक बाळकृष्ण तिम्मनावर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘रवळनाथ’च्या निपाणी शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त सेवानिवृत्त सभासद, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *