Friday , August 28 2026
Breaking News

बोरगाव येथे शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारासह मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री. जिनलक्ष्मी सोसायटीतर्फे दहावी परीक्षेत प्रथम, ते तृतीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवारी (ता.९) आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच नव्याने दहावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर मिरजे व अध्यक्ष अजित पाटील यांनी दिली.
हा समारंभ संस्थेच्या कार्यालयात पार पडणार आहे.

यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रकाश भागाजे हे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिनलक्ष्मी सोसायटीने अल्पावधीतच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रेरणा निर्माण व्हावी आणि गुणवंतांचा सन्मान होऊन इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी विद्यार्थ्यासह पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मिरजे यांनी केले.
यावेळी संचालक निलेश पाटील, प्रवीण हवले, श्रीमंधर पाटील, भरतेश लगारे, आनंद मोकाशी, रणजित ऐतवडे, पोपट चौगुले, प्रकाश फिरगण्णावर, सतीश मोरे, अश्विनी नरवाडे, श्रीदेवी तेरदाळे, अमर सातपुते, रविंद्र वसवाडे, मुख्य कार्यनिर्वाहक ओंकार मैसाळे, बाहुबली खेमलापुरे, धनंजय खेमलापुरे, शाखा व्यवस्थापक संजय आमटे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘रवळनाथ’च्या निपाणी शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त सेवानिवृत्त सभासद, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *