बेळगाव : “मातृदिनाचे औचित्य साधून सभासदांच्या मातोश्रींचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा आम्हाला आनंद आहे” असे विचार जायंट्सचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन या संस्थेच्या वतीने बुधवारी कपिलेश्वर मंदिराच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण शिंदे हे होते.
याप्रसंगी सभासद अनंत लाड यांनी आपल्या मातोश्री आनंदीबाई लाड, पद्मप्रसाद हूली यांनी आपल्या मातोश्री सुरेखा हूली तसेच इतर सभासदांनी आपल्या मातोश्रींचे पाय दूध, पाणी व फुले अर्पण करून धुतले व आशीर्वाद घेतला. याप्रसंगी विश्वास पवार यांनी प्रास्ताविक केले. अनिल चौगुले यांनी स्वागत केले. अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी संघटनेच्या विविध सामाजिक उपक्रमाबाबतची माहिती दिली.
यावेळी जायंट्सचे फेडरेशन ऑफिसर सुनील मुतगेकर, अशोक हलगेकर, राहुल बेळवटकर, अरुण काळे, अरविंद देशपांडे, दिगंबर किल्लेकर, मोहन पत्तार, पुंडलीक सांबरेकर, अजित कोकणे, ईश्वर पाटील, संजय पाटील, विकास कलघटगी, वाय एन पाटील, शिवराज पाटील व सुनील पवार आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta