खानापूर : दहावीतील यश हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे पाऊल असते. या यशानंतर पुढील शिक्षण घेताना देखील सातत्य, मेहनत आणि शिस्त कायम ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी केली पाहिजे. योग्य नियोजन, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर मोठे यश मिळविता येते असे प्रतिपादन गुंडपी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांनी केले आहे.
हलशीवाडी येथील विद्यार्थिनी अनुष्का देसाई हिने दहावीच्या परीक्षेत ६२१ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल ग्रामस्थांतर्फे तिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी गुंडपी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांनी मार्गदर्शन दहावीतील यश हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे पाऊल असून अनुष्का हिच्या यशामुळे गावातील इतर विद्यार्थ्यांना देखील अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल असे मत व्यक्त केले.
प्रारंभी नरसिंग देसाई, हलशी पीकेपीएसचे माजी अध्यक्ष सुधीर देसाई, पुंडलिक देसाई, हलशी पीकेपीएसचे संचालक राजू देसाई, माजी ग्राम पंचायत सदस्य दिनेश देसाई, अनंत देसाई, दत्तात्रय देसाई, वामन देसाई, मल्लाप्पा देसाई आदीच्या हस्ते अनुष्का हिचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
रघुनाथ देसाई यांनी स्वागत, मिलिंद देसाई यांनी प्रास्ताविक तर शेवटी अनुष्का हिने सर्वांचे आभार मानत भविष्यात अधिक मेहनत घेऊन मोठे यश संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सुनील देसाई, पुंडलिक. शा. देसाई, रमेश देसाई, राजन सुतार, निंगाप्पाा देसाई, प्रमोद देसाई, केशव देसाई, प्रमोद देसाई, प्रशांत देसाई यांच्यासह इतर ग्रामसभा उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta