Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये १ जून १९८६ रोजी झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रम तसेच सीमाभागातील मराठी भाषिकावरील होत असलेल्या भाषिक अत्याचाराच्या लढ्यासंदर्भात कार्यकर्त्यांचे विचार आजमावण्यासाठी व पुढील रुपरेषा ठरवण्यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, नियंत्रण या घटक समितीच्या कार्यकर्त्यांनी, युवा व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस ऍड एम जी पाटील, कार्याध्यक्ष आर एम चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, मोन्नाप्पा पाटील, विठ्ठल पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *